Wednesday, March 12, 2008

शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या भूमिकेवर आपली मते नोंदवण्यासाठी.

पदाचा राजीनामा द्या,
प्राचार्य मंच - अध्यक्षांना इशारा,
प्रसंगी परीक्षांवर बहिष्कारशालान्त
पर्वरी, ता. 11, वार्ताहर - गुणवाढप्रकरणी दोष मान्य करून गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष एल. एम. टी. फर्नांडिस यांनी उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा प्राचार्य मंच आणि मुख्याध्यापक संघटनेने आज शालान्त मंडळाच्या ठिकाणी एकत्र येऊन केली. फर्नांडिस यांनी पदत्याग केला नाही तर परीक्षांवर बहिष्कार टाकू, असा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.र्ंडिस यांच्या कार्यालयीन व्यवहारांची सरकारने न्यायालयीन चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली. गोवा प्राचार्य मंचचे सदानंद हिंदे, नारायण देसाई, गोवा मुख्याध्यापक संघटनेचे गोविंद देव व अन्य शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष फर्नांडिस उपस्थित नव्हते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनाची प्रत सचिव डी. आर. भगत यांना सादर केली. या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना सचिव भगत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यानंतर मंडळाच्या बाहेर जमलेल्या शिक्षकांसमोर बोलताना हिंदे म्हणाले, की अध्यक्षांनी पदाचा गैरवापर केला आहे. गुणवाढ करणे हे पूर्ण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे कृत्य आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी आपणहून या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ, उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर बहिष्कार घालू. अशा प्रकारामुळे रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचते असे ते म्हणाले. नारायण देसाई यांनी सांगितले, की या प्रकरणात जो दोषी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही हे प्रकरण न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींकडेही घेऊन जाऊ. मंडळ हे कोणा एकाची मक्तेदारी नाही. आम्हीसुद्धा त्याचे सदस्य आहोत. मंडळाला पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. पण अकरावीतील एका नापास विद्यार्थ्याला फर्नांडिस यांच्या हस्तक्षेपामुळे खास पर्यवेक्षक नियुक्त करून गुणवाढ देण्याचा व त्याला उत्तीर्ण करून बारावीत प्रेवश देण्याचा प्रकार ही शरमेची गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाच द्यावा हे योग्य आहे.नरहरी नाईक यांनी सांगितले, की यापूर्वी मंचाने सरकारी पातळीवर आवाज उठवण्याचे प्रयत्न केले. मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जायचा, पण त्याला बगल दिली जायची. शिक्षण मंडळाच्या गेल्या 18 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी अध्यक्षांनी तो मुद्दा शिक्षण संचालकांच्या कक्षेत येत असल्याचे व आपला काहीच दोष नसल्याचेही स्पष्ट केले होते. यावेळी अनिल सामंत, गोविंद देव, नवनाथ शिरोडकर, कंटक, विठ्ठल वेर्णेकर, दुर्गादास कामत, चंद्रकात हेदे यांचीही भाषणे झाली.

No comments: