टॅंकर उलटल्याने वाहतूक दहा तास खोळंबली
खालवडेतील घटना - तीनच पोलिस कार्यरत
काणकोण, ता. 31, प्रतिनिधी - खालवडे येथे राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास पेट्रोलवाहू टॅंकर उलटल्याने जवळ जवळ दहा तास राष्ट्रीय महामार्ग क्र 17 वरील अवजड वाहने अडकून पडली. त्यामुळे विद्यार्थीवर्गाची व प्रवाशांची गैरसोय झाली.या ठिकाणी टॅंकर उलटल्याची माहिती "गोमन्तक" चे छायाचित्रकार सोयरू कोमरपंत यांना आज (31) सकाळी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी तेथे फक्त तीनच पोलिस शिपाई होते. याप्रकाराची माहिती श्री. कोमरपंत यांनी भ्रमणध्वनीवरुन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस फौजा फाटा तसेच काणकोण व मडगाव येथून अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या.टॅकरमध्ये जवळ जवळ 12 हजार लिटर वाईट पेट्रोल होते. टॅंकर उलटल्याने टॅकरमधून रस्त्यावर पेट्रोल गळण्यास सुरवात झाली. काणकोण अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर पडणारे पेट्रोल प्लास्टिक कॅनच्या साहाय्याने पकडले . दुपारी एकच्या सुमारास मडगाव येथून दोन भल्या मोठ्या क्रेन्स आणून टॅंकर बाजूला काढून राष्ट्रीय महामार्ग 17 वरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी काणकोणचे मामलेदार तसेच अन्य सरकारी अधिकारी उपस्थित होते.टॅंकरच्या चालकाला किरकोळ मार लागला असून त्याच्यावर उपचार करम्यात आले . टॅंकरचा क्र. के ए -19 , 5656 असून तो मंगलोर येथून पेट्रोल घेऊन वास्को येथे जात असताना खालवडे येथे तो रस्त्यावरच उलटला.