सहापदरी मार्ग होणार
चर्चिल - नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणा
पणजी ता, 18, प्रतिनिधी - राज्यात सहापदरी जलदगती मार्ग प्रकल्पाऐवजी आता पत्रादेवी ते पोळेपर्यंत सहापदरी मार्ग बांधण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केले जातील, असे आज
बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. विरोधात असताना मात्र आलेमाव हे नेहमीच सहापदरी मार्गाला विरोध करत होते.प्रस्तावित सहापदरी मार्ग लोकांच्या मालमत्तेचे नुकसान करणारा ठरणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असून, लवकरच या प्रकल्पासाठी खास सर्वेक्षण केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सहापदरी जलदगती मार्गासाठी राज्यातील अनेक घरे जमीनदोस्त करावी लागणार होती. त्यामुळे या प्रकल्पाऐवजी घरे नाहीत अशा जमिनीतून सहापदरी रस्ता न्यावा, असे खात्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, कुठ्ठाळी ते मडगावपर्यंत चौपदरी रस्ता बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. रस्त्यांचा विस्तार व विकास करीत असताना जनतेला त्याचा मनस्ताप होणार नाही याची काळजी खाते घेणार आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी सरकारकडे काहीच निधी नव्हता. त्यासाठी आपण केंद्राकडून निधी मिळविला असून, आता कुळे ते पर्तगाळ व पर्तगाळ ते माशेपर्यंतचा महामार्गाचा विकास करण्यात येईल, असे आलेमाव यांनी सांगितले. केंद्राकडून महामार्गाच्या विकासासाठी 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन्ही रस्त्यांसाठी अनुक्रमे तीन कोटी 19 लाख 55 हजार 428 रुपये व दोन कोटी 62 लाख 52 हजार 840 रुपये अंदाजित खर्च येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी दक्षिण गोव्यात समांतर जलवाहिनी बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतींना आतापर्यंत प्रक्रिया करण्यात आलेले पाणी पुरविले जायचे. अशा पाण्याची उद्योगांना गरज नसल्याने यापुढे समांतर जलवाहिनीद्वारे त्यांना प्रक्रिया न केलेले पाणी पुरविले जाईल. त्यामुळे बचत होणार आहे, असे आलेमाव यांनी स्पष्ट केले.सार्वजनिक नळांमुळे सुमारे 25 ते 35 एमएलडी पाणी वाया जाते. हे पाणी वाचविण्यासाठी सार्वजनिक नळ काढून टाकून प्रत्येकाला स्वतंत्र व मोफत नळजोडणी देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

2 comments:
projects like 6- lane or mopa airport requires state administration with extraordinary pace, will and ability to work with. The fate of these projects is well known, as they are to be funded by private investors and the response from the private investors isn't encouraging. the politicians who have already lost their mass base int the degraded politics in last 2decades, can't decide fate of such projects any more. so, whether churchill takes up a particular developmental issue or not, it doesn't matter for anybody except for the few "labours" in his political camp. They are no more mass leaders!!
चर्चिलनी पुन्हा घूमजाव करू नये!
गोव्याच्या राजकारणात सातत्याने राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांना विरोध करण्याचे कारस्थान चर्चिल यांनी अवलंबिले होते. प्रथमच त्यांनी सहापदरी महामार्गाची घोषणा केली आहे. आता घेतलेली भूमिका ते कायम ठेवतील का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडणे साहजिक आहे. निवडणुकीपूर्वीसुद्धा ते या मार्गाला विरोध करीत होते. प्रसंगी रस्त्यांवर येण्याची भाषा त्यांनी केलीच. शिवाय सरकारला धोका निर्माण केला. आता कदाचित त्यांनी सुबुद्धी सुचली असावी आणि प्रथमच त्यांनी आगामी मार्गाबद्दल चांगले विचार मांडले आहेत. तेव्हा या विचारानुसार त्यांनी मार्गाचे काम सुरू करायला हरकत नाही. नेहमी भूमिका बदलणाऱ्या चर्चिल यांनी सहा पदरी मार्गासंदर्भात आपली भूमिका बदलू नये. आपल्या बोलल्याप्रमाणे ते वागले तर भविष्यात चर्चिल बदलले असे म्हणता येईल.
- संजयसिंह पाटील.
Post a Comment