बाबूश-पोलिस धुमश्चक्री
बंगल्यांची झडती व तोडफोड
पणजी, ता. 19, प्रतनिधी - एका तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर आज ताळगावमध्ये मोठा वाद झाला आणि त्याची परिणती शेवटी पणजी पोलिस स्थानकावरच हल्ला करण्यात झाली. तरुणाला मारहाण करणाऱ्यांना अटक करावी म्हणून पोलिस स्थानकावर आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ताळगाववासीयांनी नेलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतले. यावेळी पोलिस स्थानकाजवळील तीन वाहने जाळण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधूर सोडत लाठीमारही केला. शिवाय हवेतही गोळीबार करण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलिस स्थानकावर केलेल्या दगडफेकीत वीस पोलिस जखमी झाले. सांपॉल - ताळगाव येथे रायन गुदिन्हो (20) नावाच्या एका तरुणाला आज दुपारी एका गटाने सळईने मारहाण केली. यामुळे हल्लेखोरांना अटक करा, अशी मागणी करत ताळगाववासीयांनीपणजी पोलिस स्थानकावर मोर्चा नेला. संध्याकाळी ताळगाव बंदची हाक देण्यात आली आणि बहुतेकांनी आपली दुकाने वगैरे बंद केली. बाबूश मोन्सेरात, महापौर टोनी रॉड्रिग्ज, नगरसेवक दया कारापूरकर आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
--------------------
बंगल्यांची झडती व तोडफोड
पणजी, ता. 19, प्रतनिधी - पणजी पोलिस स्थानकावर मोर्चेकऱ्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला व त्यामुळे जमाव पांगला. मात्र लगेच प्रत्युत्तरादाखल पोलिसही बरेच आक्रमक बनले. आमदार बाबूश मोन्सेरात, त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात व त्यांच्या एका मुलासह महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी मोन्सेरात यांच्या ताळगाव व मिरामार येथील बंगल्यांचीही झडती घेतली. तेथील बाबूश यांच्या आलिशान वाहनांची मोडतोड करण्यात आल्याचे मोन्सेरात समर्थकांनी सांगितले. पोलिस स्थानकावर बाबूश व टोनी यांना मारबडव करण्यात आल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.रात्री उशिरा ताळगावमध्ये वातावरण अधिक तंग झाले तर पणजी पोलिस स्थानक परिसराला युद्धभूमीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी बाबूश यांच्या ताळगाव व मिरामार बंगल्याची झडती घेतली. पणजी पोलिसांनी अगोदर बाबूश यांच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यामुळे जेनिफर स्वतः पोलिस स्थानकावर आल्या असता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर बाबूश व टोनी आले व त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस स्थानकाबाहेर बघ्यांची गर्दी जमत होती. मात्र गटागटाने लोक जमू लागल्यानंतर पोलिस जमावाच्या मागे धावत येऊ लागले व मग लोकही मिळेल त्या वाटेने पळू लागले. यावेळीही थोडा लाठीमार झाला.बाबूशची वाहने फोडण्यात आल्याने त्यांच्या ताळगाव येथील बंगल्यासमोर काचांचा खच पडल्याचे दिसत होते. एकंदरीत ताळगाव प्रकरण आता अधिक गंभीर बनले आहे. पोलिस स्थानकावर काहीजणांना मारबडव झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, पणजी पोलिस स्थानकावरील हल्ल्यावेळी वीस पोलिस जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची स्थिती गंभीर आहे. त्यांच्यावर गोमेकॉ इस्पितळात उपचार सुरू आहेत.

11 comments:
गुंडप्रवृत्तींचा बंदोबस्त केला पाहिजे!
ताळगाव म्हणजे आपले संस्थान, संस्थानात आपल्या मर्जीप्रमाणे सर्वकाही चालवू पाहणाऱ्या ताळगावच्या आमदारांचे गैरकृत्य वेळीच बंद झाले पाहिजे. गोव्यातील विविध पक्षांनी सत्तेसाठी केलेल्या तडजोडीतूनच बाबूशसारख्या व्यक्ती तयार होतात. त्यांच्या मनाप्रमाणे पोलिस, राजकारणी, पक्षांनी वागले नाही, तर ते मग आपली गुंडप्रवृत्ती बाहेर काढतात. मोर्चे काढणाऱ्यांना मारतात, महत्त्वाच्या प्रकल्पाला विरोध करतात प्रसंगी स्वतः मोर्चा काढून पोलिसांनाच मारहाण करतात. ताळगावच्या जनतेने आता आपल्या सुरक्षिततेचा विचार करायला हवा. ताळगावतील अशा प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी डोळसपणे विचार करायला हवा. आपल्या मतांचे मूल्य जाणून मतदार करायला हवे.
ताळगावचे विकृत प्रवृत्तीचे राजकारण गोव्याला बिहार, उत्तरप्रदेशची आठवण करून देणारे आहे. पोलिसांनी कालच्या मारहाण प्रकरणी केलेली कृती योग्य असून या प्रकरणातील पाळेमुळे शोधून ती नष्ट करावी. भविष्याचा विचार करता या प्रवृती राज्याच्या हिताच्या नाहीत. सरकार स्थिर राहाण्यासाठी, कायदा व्यवस्था सुरळीत चालण्यासाठीसुद्धा या प्रवृती घातक आहेत. ताळगावचे राजकारण उद्या इतरत्रही घडू शकते, तेव्हा अशा प्रवृत्तींचा बीमोड करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिसांनी कंबर कसली पाहिजे. आम आदमीची हीच अपेक्षा आहे.
- जी बालू.
"PEOPLE LIKE TO STAY IN GOA BECAUSE OF THEY KNOW THAT OUR STATE IS PIECEFUL STATE TO STAY BUT WHAT RECENTLY WHAT GOING ON WILL TAKE GOA AS MOST UNSAFE PLACE TO LEAVE IF WE HAVE NOT CONTROL THE SITUATION IN TIME WE WILL BE NEXT JAMMU&KASHMIR WERE LIFE IS UNSAFE".
As asked in your title question, the Taleigao Politics shall lead us in the Panjim Nullah. This shameful incident has brought to fore three specific issues of utmost importance. The primary issue is that an entire village, having a history of spontaneous & uncontrolled agitations with use of force, walks about 2 kms on a open road and then enters the Capital City and walks a further 2 kms to reach the Police through the busy roads, - and the Police intelligence Department is not aware of it - SHAMEFUL. If the Police cannot feel the pulse of such situations,then how would they know about any terrorist plots. Secondly, the Mayor - the First Citizen of the Capital City, walks with a rowdy crowd and makes his huge presence felt when the Police station is being pelted, how little can he portray himself. Does the post of Mayor have no protocol? Would you find the Mayor of Mumbai, involve himself in petty issues? Lastly, what has happened to the sacrifices made by the martyrs to free our land from a despotic & unjust regime? Was their blood lost in vain? Have we jumped from the frying pan into the fire? Does our administration have no back bone? This issue is a lesser version & almost similar to the Pakistani Terrorists attacking the Parliament; here it was a Police Station. "HALLA BOL" is recommended to a lot of citizens who have put their tails between their legs, but do not hesitate to bark suggestions over alcohol and behind closed doors in parties. The question to be asked here is not where Taleigao Politics will lead us, but " Where has the brave spirit of the People of the land of Goa gone?" In comparison with rabindranath tagore's poem " Where the head is held high . . .", please request our Remo or Prince Jacob to write a song on "how we Goans love to hang our head in shame". Today words have no meaning if their meaning is not understood. What is required are good leaders and not leaders with Fevicol on their backsides. The reason lies in us, the Goans.
पणजी पोलिस स्थानकावर गेलेला मोर्चा हिंसक बनला. कायदा हातात घेऊन पोलिस स्थानकाची मोडतोड करणे मोर्चेकऱ्यांचे बेताल होणे, हे सर्व चुकीचे होते. एरव्ही शांत असणारी राजधानी पणजी व ताळगावातील वातावरण गढूळ व दूषित झाले. एका व्यक्तीसाठी हे सर्व झाले. ज्या व्यक्तीसाठी हा प्रकार झला. त्याच्यावर भर रस्त्यात पोलिसांच्या देखत झालेल्या हल्ल्याचे समर्थन कोणीच करणार नाही. ताळगावचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी थेट पोलिस प्रमुखांशी चर्चा करून वस्तुस्थिती दाखवून दिली असती व पोलिस प्रमुखांनी ती समजून घेऊन नंतर कारवाई केली असती, तर पुढील प्रसंग टळला असता. परंतु तसे झाले नाही. जमावावर नियंत्रण ठेवणे नेते व पोलिसांनाही कठीण जाते, हे अनुभवाला आले.
पोलिसांनी एखाद्याच्या घरात जाऊन तेथील लोकांना मारहाण करणे कोणत्या शिस्तीत व कारवाईत बसते? याचा सर्वांनीच विचार करायला हवा. लोकप्रतिनिधींना जर पोलिस असे वागवत असतील, तर सामान्य माणसांनी कोणाकडे दाद मागायची? झाल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी आता राजीनामा द्यायला हवा.
सी. प्रकाश
This is cruel and unlawful if politicion like babush and his family got treatment like this then what about common man we cant imagine how police will treat the the normal person.
First we belive that police is our friend but they have me to change my view.
I DONT KNOW
I was astonished to read the comments made by Ravi Naik who is supposed to be the current Home minister in this discredited Congress government. He seems to find it difficult to understand that as the leader of the opposition or even as a decent law abiding person, it was Manohar Parrikar;s duty to support action against the goons who caused damage to Panaji police station and caused injury to policemen and women.
However, that night, police seem to have gone berserk and brutally assaulted individuals and damaged personal property of Mr Monserattte showing utter disrespect to the rule of law. I base these assertions on the video footage published on the website: Youtube. Parriker was, therefore, absolutely right in demanding a judicial inquiry into this whole episode.
In any other democratic set up, the home minister as well as the chief minister would have taken responsibility for this lawlessness in the capital city under their governance and at least offered their resignation. Instead, we find the Home minister levelling charges against the leader of the opposition as if Parrikar was in charge of home ministry today.
I have some advice for Shri Naik. We all know that Digu snatched the chair from under you at the midnight coup and you have been sulking ever since.However, You are the home minister now. The least you can do is set up a judicial inquiry.
I am no admirer of Mr Monseratte but I am a family man and a goan and I will be writing to the Indian Human rights commission today asking for a judicial inquiry.
Dr Anil Desai
The only politician to come out of this shameful chapter in Goan history is Shri Manohar Parrikar.
If Goa and goans have an inch of sense left , they should strive to get this eunuch-ial Congress government ( with its spineless and brainless leaders )dismissed post haste and vote in a Manohar Parrikar led government at fresh hustings.
Or we can forget our Goa as we know it and prepare to live in an anarchial state.
ताळगावचे कुडचडे होऊ देऊ नका
गेले दोन-तीन दिवस ताळगाव परिसर एका वेगळ्याच भयात असल्यासारखे वाटत आहे. दोन वर्षांपूर्वीपासून असेच तणावग्रस्त वातावरण कुडचडे परिसरात पसरले. त्यातून कुडचडे अजून पुरेसा सावरायचाय. श्रीमंतांना काही त्रास नसला तरी गरिबांना मात्र अशा तणावग्रस्त वातावरणाची मोठी झळ सहन करावी लागते. तेव्हा राजकारण्यांनी दूरगामी विचार करूनच आपले धोरण आखायला हवे. ताळगावच्या राजकारणात जोश, जिगर असली तरी दूरदृष्टीची अजून गरज आहे. तेव्हा झाले गेले मांडवीला मिळाले. कोणतीही सूडभावना न ठेवता, ताळगावचे कुडचडे होऊ देऊ नका, हीच एक सामान्य नागरिक म्हणून विनंती.
- उमा कुलकर्णी
This is really wrong think both MLA & Police acted like gunda raj as in democracy thinks can be sorted out by talk , But now minister are again making mistake by supporting MLA Monsarad this will reduce faith of citizans in police & which will generate wronge message in the world which should not happen
Post a Comment