Monday, January 28, 2008

"शाहरूख'ची ही भूमिका योग्य की अयोग्य? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा





तिथे चौकशी; इथे ऐशीतैशी!
धूम्रपानाची दृश्‍ये ः शाहरुखने विनंती फेटाळली
नवी दिल्ली, ता. 28 - पडद्यावर धूम्रपान न करण्याची केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांची विनंती फेटाळताना अभिनेता शाहरुख खानने "अभिव्यक्तिस्वातंत्र्या'चे हत्यार उपसले आहे.
धूम्रपानाची दृश्‍ये दिल्याबद्दल अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यावर रामदास यांनी टीका केली होती. त्याबाबत शाहरुख म्हणाला, ""चित्रपटाच्या आणि एकूणच कलेच्या क्षेत्रात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्व मान्य करायला हवे. छोट्या-छोट्या गोष्टींभोवती फिरत राहू नये; कारण हा केवळ सिनेमा आहे, सत्य नव्हे. सत्याचा आभास आहे आणि त्यावर अशी "सेन्सॉरशिप' लादली जाऊ नये.''
फ्रान्सच्या "ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ आर्टस अँड लेटर्स' पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना, रामदास यांच्या टीकेसंबंधीची बातमी आपण टीव्हीवर पाहिल्याचे शाहरुखने सांगितले. ""हा उदात्त विचार आहे. मला वाटते, रामदास यांनी माझ्या दैनंदिन जीवनात मला धूम्रपानापासून परावृत्त करावे; पण चित्रपटात सारे काही आभासी असते,'' असे तो म्हणाला. आपण आपल्या मुलांना धूम्रपानाचे दुष्परिणाम सतत सांगतो आणि शक्‍य तितक्‍या लवकर धूम्रपान सोडण्याची इच्छा व्यक्त करतो, अशी पुस्तीही त्याने जोडली.

4 comments:

sakaal papers said...

"शाहरुख'ची भूमिका अयोग्य!

आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांनी शाहरूखने चित्रपटात धूम्रपान करतानाची दृश्‍य देऊ नये, अशी विनंती केली. त्यात गैर काहीच नाही. उलट शाहरूखने त्यांचे आभार मानायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे शस्त्र पुढे करून त्यांची सूचना फेटाळण्याचा उर्मटपणा शाहरूखने केलाय. चित्रपट पहाणाऱ्यात लहान मुलांपासून थोरांपर्यंत प्रेक्षकांचा समावेश असतो. छोट्या मुलांना धूम्रपानाचे तोटे माहिती नसतात, त्यांचा शाहरुखवर मोठा विश्‍वास, शाहरुख प्रिय असल्यामुळे त्यांचे अनुकरण करणे शक्‍य आहे. तेव्हा छोट्यांचे जीवन वाचवण्यासाठी, त्यांना चांगले धडे देण्यासाठी शाहरूखने धूम्रपानाचे दृश्‍य देऊ नये. स्वतःचे आयुष्य भस्म करून घ्यायचे असेल, तर आमची हरकत नाही, त्यांने खुशाल करावे! त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यांच्या आड कोणीही येणार नाही.
- जी संजय

oconcept said...

शाहरुखवा, बिडी ना जलैले
चित्रपटात सारे काही आभासी असते. स्क्रिप्टची जशी गरज असेल तसा अभिनय करावा लागतो हे शाहरुख खानचे विधान निषेध करण्यासारखे आहे. त्याच्या मताशी सहमत व्हायचे झाले तर मग उद्या स्क्रिप्टच्या गरजेप्रमाणे तुम्ही काहीही दाखवाल. अश्‍लील चित्रपटाच्या स्क्रिप्टची गरज काय असेल. तशा चित्रपटात ऑफर आली तर हा किंग खान कोणते रूप दाखवणार? तेव्हा स्क्रिप्ट गेलं तुमच्या धुराड्यात. आम्हा प्रेक्षकांना काही तरी चांगलं द्यायचं असं जरा तरी वाटत असेल तर या फौजीने आपली ही सकर्शीतली पोपटपंची थांबवावी आणि त्याने शरीराला हानिकारक असलेल्या कोकची जाहिरात न करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. गोपिचंदप्रमाणे आपल्या विचारांशी ठाम राहावे.
- जयप्रकाश

Unknown said...

बेजबाबदार शाहरुख
सार्वजनिक जीवनात वावणाऱ्यांनी आपल्या वागण्या बोलण्यात थोडा ताळतंत्र ठेवला पाहिजे. त्यात ती व्यक्ती खूपच प्रसिद्ध असेल तर त्यांची जबाबदारी आणखीनच वाढते. अमिताभ बच्चन व शाहरुख खान या दोघा स्टार्सना केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी यांनी केलेली विनंती योग्यच म्हटली पाहिजे. अमिताभने अद्याप त्यावर मतप्रदर्शन केले नसले तरी शाहरुखने मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे तो पूर्णत: गैरलागू तर आहेच, शिवाय बेजबाबदारपणाही आहे.
अनुज

Ganesh said...

it is the observation of the note (nationnal organization for tobacco eradication) through the survey conducted nationwide, that the ultimately atleast 10 percent of the young viewers immitate the celebreties and become cigarette edicts. the celebraties who are insensitive to such hard facts loose the moral right to promote ''Chakde India".