Wednesday, January 30, 2008

महिला उद्योजकांना संधीचेंबरचा पुढाकार

राज्यातील महिला व्यावसायिकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या (जीसीसीआय) महिला विभागातर्फे खास प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महिला विभागाच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.गोव्याच्या महिलांमध्ये व्यावसायिक कुशलता आहे परंतु त्यांचा उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळणे बरेच कठीण असते अशा परिस्थितीत या महिलांची उत्पादने प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांच्या पुढ्यात आल्यास फायदेशीर ठरू शकते असे धोंड यावेळी म्हणाल्या हे. "अस्तुरी' असे नामकरण करण्यात आलेले हे प्रदर्शन 14 ते 17 फेब्रुवारी या दरम्यान कला अकादमी येथे भरवण्यात आहे.या प्रदर्शनात हैदराबाद, बंगळूर, पुणे, कोलकता येथून महिला व्यावसायिक आपली उत्पादने घेऊन येणार असून सुमारे 70 स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. हस्तकला, खाद्यपदार्थ, मातीची शिल्पे, कृत्रिम दागिने, सजावटीचे सामान, तसेच साड्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

2 comments:

prakashkshirsagar said...

गोवा चेंबर ऑफ कॉमर्स महिला उद्योजकांना संधी देणार असल्याचे वृत्त आनंददायी व आशादायक आहे. परंतु गोवा चेंबर काय किंवा भारतीय उद्योग महासंघ काय, ही फक्त उच्चभ्रू उद्योजकांची संघटना आहे, असा अनुभव लघुउद्योजक व त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील महिलांना नेहमीच येतो. गोवा चेंबर आता याबाबत पुढाकार घेत असेल तर आधी तळागाळातील व खेड्यापाड्यांतील महिलांना संधी आधी मिळाली पाहिजे. दै. गोमन्तकमधील "भरारी' या सदरातून अशा कितीतरी महिलांच्या उद्योगांची माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे. गोव्यातील स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योजक म्हणून भरारी घेऊ पाहणाऱ्या महिलांसांठी "अस्तुरी' हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार काय? बातमीतील मजकुरावरून तरी तसे दिसत नाही. गोव्यातील या महिलांसाठी चेंबर ऑफ कॉमर्सने काहीतरी करायला हवे. या महिलांनी शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे. त्यांना चेंबरचा आधार मिळाला तर देशपातळीवर या महिलांची उत्पादने जाऊ शकतील. त्यांचा व्यवसाय व उद्योग तसेच उत्पादन वाढविण्यासाठी चेंबरने प्रशिक्षण व अर्थसाह्याचे उपायही करायला हवेत.
- चित्रा

- सौ. चित्रा क्षीरसागर, ताळगाव