निर्णय आमआदमीच्या हाती
विकास हवा, की नको - दिगंबर कामत
कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत गोमंतकीयांना आवाहन
पणजी, ता. 30, प्रतिनिधी - आम्हाला गोव्यात उद्योग हवेत, की नको हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. गोव्याचा विकास झालेला हवा की नको, याबाबत गोमंतकीयांनी आता निर्णय घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज येथे केले.येथील कॉंग्रेस भवनात झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. लोकांना नको म्हणून आपण सेझ रद्द केले. गोव्यात सेझ नको ही आपल्या सरकारची आणि कॉंग्रेस पक्षाचीही भूमिका आहे. मात्र, चांगले उद्योग गोव्यात यायला हवेत. गोमंतकीयांनीही प्रत्येक गोष्टीला विरोध करू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.आम्हाला उद्योग हवेत की नको ते ठरविण्याची वेळ आता आली आहे. छोट्या डबक्यातच आम्हाला राहायचे आहे काय? विकास झालेलाच नको आहे काय? एखादा उद्योग आल्यानंतर त्याच्यासोबत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी येतील. गोमंतकीयांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.राज्यपालांवर भाजपतर्फे शिंतोडे उडविले जात असून त्याचाही कॉंग्रेसने बैठकीत निषेध केला. मुख्यमंत्री कामत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सेझ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारा ठराव बैठकीत घेण्यात आला. मुंबई येथे भाजप नेत्यांनी घेतलेल्या बैठकीपासून गोव्याचे लक्ष इतरत्र वळावे म्हणून तो पक्ष राज्यपालविरोधी मोहीम राबवत आहे, असे सार्दिन म्हणाले. अधिसूचित झालेले तीन सेझही रद्द करण्यासाठी गोवा सरकारला मदत करावी, अशी विनंती कॉंग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांना केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
सेझशी भाजपची युती कॉंग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत एका ठरावाद्वारे भाजपचा निषेध करण्यात आला, अशी माहिती यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष फ्रान्सिस सार्दिन यांनी दिली. सरकार पाडण्याच्या प्रयत्नांमध्ये भाजपचा हात होता. मुंबई येथे सेझच्या लॉबीबरोबर भाजप नेत्यांची बैठक झाली. आपले सरकार अधिकारावर आल्यास गोव्यात सेझ अस्तित्वात आणू, अशी हमी भाजप नेत्यांनी सेझच्या लॉबीला दिली होती, असे सार्दिन यांनी सांगितले व कॉंग्रेसने याचा निषेध केल्याचे स्पष्ट केले.

2 comments:
whichever may be the industry, the wasted intrests of the real estate and its links with the state administration has bee alway a bone of contention. a topic of worry. problems cropping up at the stage of land aqusition itself. The industry, however "Green" it may be, will not serve expected purpose for the local youths if it is real estate intended. will only generate colonies for the immigrants in the name of business! the industrial sector be isolated from real estate links.
Youth of goa should be motivated in doing agricultural activities which inturn will help to save the land from estate developers. Developemnt of agricultural can only save the land of goa from mining and estate activities. govt. should garantee the agriculturists that they will provide market to the agricultural product. Because one side our Govt. is thinking of agriculture development and other side they are thinking of closing the Sugar Factory situated at Dharbandora.
Sandeep
Post a Comment