पणजी, ता. 3, प्रतिनिधी - गोव्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे दहशतवाद्यांचे नियोजन होते, असा कट नुकताच हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. येथे येणाऱ्या इस्रायली पर्यटकांना येथील ठराविक समुद्र किनाऱ्यांवर लक्ष्य बनविण्याचे लष्कर-ए-तैयबा व हरकत-उल-जिहादी-अल-इस्लामी या संघटनांचे नियोजन होते व यासाठी मोटारसायकलींची (बाईक) चोरीही दहशतवाद्यांनी केली होती, या खळबळजनक माहितीचा उलगडा हैदराबाद येथे अटक केलेल्या रझिउद्दिन नसीर याने पोलिस चौकशीच्या वेळी केला आहे. नसीर व कर्नाटकचा असादुद्दिन अबुबकर यांना
हैदराबाद येथील बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी ही माहिती उघडकीस आली. आतापर्यंत 12 राज्यांचे पोलिस व गुप्तचर यंत्रणांनी नसीर याची चौकशी केली आहे. 25 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे घडवून आणण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांनंतर नसीर गोव्यात आला होता. स्फोट घडवून आणण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यांची चाचपणी व निवड करण्याच्या मोहिमेवर तो होता, असे त्याने सांगितले आहे. 22 वर्षीय नसीर हा अभियांत्रिकी विद्यार्थी असून त्याने पाकिस्तानमधील हुजी प्रशिक्षण केंद्रात दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले. गोव्यात मोठ्या प्रमाणात इस्रायली पर्यटक येत असल्याने आपण गोव्याची निवड केल्याचे त्याने म्हटले आहे. हे स्फोट तो नेमके कसे घडवून आणणार होता, ती योजना त्याने स्पष्ट केलेली नाही, तरी गोव्यातील चार समुद्र किनाऱ्यांवर बॉम्बस्फोटांचे नियोजन होते, असे त्याने म्हटले आहे.लखनौ, वाराणसी व गोरखपूर येथील बॉम्बस्फोटांमध्ये मोटारसायकलींचा स्फोट घडवून आणण्यासाठी वापर करण्यात आला होता. नसीर व त्याचा साथीदार अबुबकर यांच्याकडून दावणगिरी पोलिसांनी चोरीच्या 11 मोटारसायकली ताब्यात घेतल्या. चैनीसाठी या मोटारसायकली त्यांनी चोरल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले असले, तरी त्यांनी त्या अन्यत्र विकल्या नाहीत अथवा वापरून टाकून दिल्या नाहीत. हीच बाब चिंतनीय व मोटारसायकल चोरी करण्यामागील हेतू उघड करण्यास पुरेशी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गोव्यात स्फोट घडवून आणण्यासाठी त्याने एजंटकडून 50 किलोच्या स्फोटकांसाठी व्यवहार केला होता. या एजंटचे नाव व तो व्यवहार नेमका कसा झाला, ही माहिती त्याने उघड केलेली नाही. नसीर याने काही गटांशी साधलेला दूरसंपर्क गुप्तचर संस्था व पोलिसांनी "टॅप' केल्यामुळे नसीर तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला.
___________________________________________________________________________________
सतर्क राहू - गृहमंत्री
दरम्यान, या प्रतिनिधीने गृहमंत्री रवी नाईक यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, हैदराबाद पोलिसांना संशयितांनी दिलेली माहिती खरी असेल, तर ते
धक्कादायकच आहे. आम्हाला सतर्क राहावे लागेल. गोवा पोलिस सर्व प्रकारे काळजी घेतच आहेत, असेही ते म्हानाले.
___________________________________________________________________________________
दहशतवाद्यांचे नियोजन
- गेल्या वर्षअखेर चार समुद्रकिनाऱ्यांची चाचपणी
- चोरलेल्या मोटारसायकलींचा बॉम्बस्फोटासाठी
- इस्रायली पर्यटक संभाव्य लक्ष्य
- 50 किलो स्फोटकांचा व्यवहार

7 comments:
in a country with 100 crore and expanding multireligious popuation its not at all possible to control the terrorism. terrorists if they want they can strike at any place, under present lethargic security conditions. They are not doing it often, that's because of our good destiny. To weed out the extremist's preaching and trainnig centres within India is the only effective solutin to control terrorism. Then cross-border terrorism is an issue to be looked in at later stage. The asssistatnce to these forces from the well wisher community within India should be tackled at first stage.
गोव्याच्या सुरक्षिततेसाठी आम आदमी जागृत हवा
आज जगभर दहशतवाद्यांच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. त्याचा मुकाबला करणे तसे खूपच कठीण आहे. पण जर का आम आदमी जागृत असेल तर या दहशतवाद्यांच्या कृत्यांपासून गोवा सुरक्षित ठेवता येतील. यासाठी पर्यटकांशी नेहमी संपर्क येणारी हॉटेल, रेस्टॉरंट, एसटीडी, पीसीओ बूथ, बसेस, बीच, सार्वजनिक केंद्रे अशा ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी, नागरिक यांना आता प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या प्रशिक्षणामध्ये एखाद्या पर्यटकाची थोडी जरी संशयास्पद हालचाल दिसली की त्याची नोंद घेऊन पोलिसांना कशी कळवावी याचे शिक्षण दिले जावे. तसेच यासाठी महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या गावांमध्ये आता स्थानिक सुरक्षा समिती नेमावी. यामध्ये त्या त्या गावातील मान्यवर नागरिकांचा समावेश असावा. या समितीने नियमित भेटून आपल्या परिसरामध्ये पर्यटकांच्या हालचाली कशा होत आहेत याविषयीची माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल स्थानिक पोलिसांना द्यावा. एकूणच आता पर्यटकांचे स्वागत करावेच पण त्यांच्यावर नजरही हवी.
- रेश्मा शिरगावकर, बेती
गोवा हे देशातील एक आघाडीचे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून येथे घातपाती कारवाया झाल्यास त्याचा पर्यटनावर आणि पर्यायाने गोव्यातील प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेल्या पर्यटन व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर गोव्याची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. केंद्राकडून अत्याधुनिक प्रशिक्षण घेतलेले सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबरच गोव्यातील स्थानिक जनतेनेही त्यांना योग्यतऱ्हेने सहकार्य केल्यास सुरक्षेचा दर्जा आणखी वाढू शकतो. राज्यसरकारनेही संरक्षण विभागाकडे विशेष लक्ष देऊन त्यातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
the people of goa should become aware of the illmentality of the jihadi muslims and should take steps along with the police to teach these people a good lesson . if we do not stand against them then our goa will become next jammu and kashmir. so please come out of the covering of pseudosecularism.
In my view in Goa we do not have adequate security system to prevent terrorist activities.We need trained personnel.Secondly general public should be vigilant and co-operate with security departments.
राजधानी दिल्लीत अतिरेकी घुसू शकतात. संसदेवर हल्ला करू शकतात, हे आजवर अनुभवाला आले आहे. त्यामुळे गोव्यातील सुरक्षा यंत्रणेने गाफील राहणे परवडणारे नाही. गोव्यात तर नेहमीच अतिमहनीय व्यक्ती येत असतात. काही जण विश्रांतीसाठी येत असतात. त्यांच्या ताफ्यातही अनेकजण असतात. अतिरेकी हे माणुसकीचे शत्रू असतात. त्यामुळे अतिरेक्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सुरक्षारक्षकांनी दक्षच राहायला हवे. चार पैशांसाठी लोक अतिरेकी बनतात. अतिरेक्यांना आई, बाप, बहिण भाऊ काही कळत नाही. त्यांचे ब्रेनवॉशिंग झालेले असते. सुरक्षारक्षकांचेही ब्रेनवॉशिंग आवश्यक आहे.
दक्ष नागरिक
goa police is cable in handeling terorist activity because of them we can easily sleep at night
Post a Comment