Thursday, February 7, 2008

राष्ट्रीय महामार्ग : मृत्यूचा सापळा!


नईबाग-मालपे नाका: पाच वर्षांत 94 अपघात, 87 जखमी, 15 बळी


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र. 17 वरील नईबाग नाका ते मालपे नाक्‍यापर्यंतचा चार किलो मीटर अंतराचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलाच जणू बनला आहे. गेल्या महिन्यात या महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच अकरा जणांचे बळी गेले व दहा जण गंभीर जखमी झाले. याआधी झालेल्या अपघातांत अनेकांना आपले अपघातात जीव गमवावे लागले आहे, तर काही प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले आहे. यावरून या ठिकाणच्या रस्त्याची आखणी अयोग्य पद्धतीने झाली आहे याची सहज कल्पना येते.अपघात प्रवण क्षेत्रातील या रस्त्यावर मुंबईकडून गोव्यात येताना पहिले अपघात स्थळ हे नईबाग (पुलाजवळील) नाका. येथे सुमारे दीड किलो मीटरची उतरण आहे. ती संपते तिथेच वळण असून याच ठिकाणी पेडण्यात जाणारा रस्ता जोडला आहे. वळणामुळे या ठिकाणी समोरून येणारी वाहने अजिबात दिसत नाहीत. शिवाय सूचनाफलक नसल्याने येथे नाका असल्याची कल्पना नवख्या चालकांना नसते. यामुळे या ठिकाणी अधूनमधून अपघात होत असतात. वेगात आलेल्या वाहनाला या वळणावरील अपघात चुकविण्यात कसेबसे यश आले तरी, चालकाचे नियंत्रण गेल्यामुळे तिथून पंचवीस तीस मीटर अंतरावरील पुलाच्या कठड्याला धडक बसण्याचीही शक्‍यता असते.या ठिकाणाहून पुढे तीस पस्तीस मीटर अंतरावर महामार्गाला सातार्डा पुलावरून जाणारा रस्ता जोडलेला आहे. याठिकाणीही नेहमी अपघात होत असतात. याशिवाय नईबाग ते मालपे नाक्‍यापर्यंत लहान मोठी मिळून सात वळणे आहेत. या सातपैकी तीन-चार वळणांवर हमखास अपघात होतात.

1 comment:

sakaal papers said...

वाहतूक व्यवस्थेकडे डोळस लक्ष हवे
अलीकडच्या काळात गोव्यात सर्वच रस्त्यांवर अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे. प्रत्येक दिवशी एखादा छोटा - मोठा अपघात घडतोच.
वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने अवजड वाहनांसाठी नियंत्रक बसवण्याची सक्ती केली आहे, परंतु याकडे ट्रक चालक, मालक दुर्लक्ष करतात. आंदोलन करण्याची भाषा करतात. मोर्चा काढतात, संबंधितांचा निषेध करतात. अशा लोकांना निरपराध्यांचे बळी गेलेले चालतात का? वेग नियंत्रणात ठेवला तर त्यांचे फार नुकसान होणार नाही, तर उलट अपघात कमी होतील. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून सुखरूप प्रवास करतात येईल.
भरधाव वाहने हाकणाऱ्यांवर कारवाई करायलाच हवी, वेग नियंत्रक बसवण्याची सक्ती योग्य असून अंमलबजावणी चोख व्हायला हवी. तपासणी करताना शंभर, दोनशे रुपये हातावर ठेवून वाहने पुढे हाकणाऱ्या चालकाबरोबरच, अशा भ्रष्टाचार करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी. हेल्मेट नाही म्हणून दंड न करतात, फक्त पंचवीस, पन्नास रुपये घेऊन चालकांना सोडले जाते. पावती दिली जात नाही. ते पैसे पोलिस आपल्या खिशात घालतात. अशा भ्रष्टाचारी पोलिसांना पकडून त्यांनाच दंड केला पाहिजे. मंत्री, अधिकाऱ्यांनी फक्त घोषणा देऊन, भाषणे ठोकून काहीच उपयोग होत नाही, त्याची कार्यवाही करावी. तरच वाहतूक व्यवस्था सुधारेल.

बाळासाहेब पाटील