"वास्को बंद'ला चांगला प्रतिसाद अभियानचा दावा
दोन्ही बाजूंच्या कडक भूमिकेमुळे स्थिती "जैसे थे'
वास्को, ता. 11 प्रतिनिधी - कोळसा प्रदूषण आणि विस्तारवाद यासंदर्भात केलेल्या मागण्यांची "एमपीटी'कडून (मुरगाव पोर्ट ट्रस्ट) न झाल्याच्या निषेधार्थ "मुरगाव बचाव अभियान'ने आज पुकारलेल्या "बंद'ला उत्तम प्रतिसाद मिळाला. तथापि, कोणताही तोडगा न निघाल्यामुळे मूळ प्रश्न अजूनही "जैसे थे' आहे.मुरगाव बंदरातील निरनिराळ्या जहाजांभोवती नौकांनी गराडा घातला, तर बंदराकडे जाणाऱ्या मार्गावर पिकअप आडवे ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुरगाव बंदरातील व्यवहार ठप्प झाले. परिणामी एमपीटीला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. सडा, नवे वाडे, शहर भाग, बायणा मांगोरहिल व परिसरातील सर्व व्यवहार व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून "मुरगाव बचाव अभियान'ला पाठिंबा दर्शवला. सडा भागातील मिनी बस सेवा वगळता इतर भागांतील बस सेवा सुरळीत सुरू होती.अखिल गोवा बार्ज मालक संघटना अखिल गोवा मच्छिमारी बोट मालक संघटना, लॉंच मालक संघटना, बायणातील रापणकार व होडी मालक संघटना, वाडे नागरिक समिती, सडावासीय यांनी संयुक्तरीत्या बंदची हाक दिली होती. एमपीटीच्या विविध प्रकल्पांमुळे येथील पारंपरिक व्यवसायांवर तसेच रहिवाशांवर मोठा परिणाम होण्याची भीती "अभियान" ला वाटत आहे. यास एमपीटीचे अध्यक्ष कारणीभूत असल्याचा आरोप अभियानने केला होता. बंद यशस्वी होण्यासाठी अभियानने काल रात्रीपासूनच तयारी केली होती. ट्रॉलर्स (स्वयंचलीत मच्छीमारी नौका) व बोट मालक यांनी मच्छिमारीसाठी न जाता काल रात्रीपासून आपले ट्रॉलर्स व बोट समुद्रात नांगरुन ठेवल्या होत्या. येथील मासळी विक्रेत्यांना आज मासळी बाजार बंद ठेवण्याची सूचना करण्यात आल्याने बायणा, सडा व शहर भागातील मासळी बाजार बंद होते. तसेच शहर भाग, बायणा, मांगोरहिल, नवेवाडे, सडा येथील काही अपवाद वगळता हॉटेल, दुकाने, इतर व्यवहार पूर्णपणे बंद होते. सडा चौकापर्यंत चौपदरी महामार्ग नेण्यात येणार असल्याने बरीच बांधकामे मोडण्याची गरज आहे. एमपीटीने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध सडावासीयांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. यामध्ये सडा भागातील मिनी बस मालकही सामील झाल्याने नागरिकांचे हाल झाले.सकाळी खारीवाडा येथून नागरिकांनी मोर्चा काढून एमपीटीच्या अध्यक्षांविरोधात घोषणा दिल्या. नंतर मोर्चा मुरगाव बंदरातील नऊ क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर दहा पंधरा टेम्पो आडवे तिडवे उभे करुन तसेच प्रवेशद्वार क्रमांक एकसमोरही काही टेम्पो उभे करून प्रवेशद्वारांचे मार्ग अडवण्यात आले. मच्छीमारी नौका व ट्रॉलर्स यांनी समुद्रतील जहाजांना धक्क्यांकडे येण्यास तसेच धक्क्यावरुन जाण्यात अटकाव केला. त्यामुळे मुरगाव बंदरातील व्यवहार ठप्प झाले. यानंतर सर्व मोर्चेकरी चौकात जमा झाले. तेथून त्यांनी एमपीटीच्या अध्यक्षांविरुद्ध घोषणा दिल्या आणि एमपीटीच्या प्रशासकीय इमारतीसमोर काळे बावटे दाखवून निदर्शने केली. यात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मोर्चात अभियानाचे पदाधिकारी, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, मुरगावच्या प्रभारी नगराध्यक्षा सौ. अनिता चोपडेकर, नगरसेवक कार्लूस आल्मेदा, सेबी परेरा, सैफुल्ला खान, आर्नाल्ड रेगो, नगरसेविका सौ. शांती मांद्रेकर, रोहिणी परब, सौ. लविना डिसोझा, नगरसेवक शेखर खडपकर, राजेश घोणसेकर नगरसेविका किशोरी हळदणकर, चिखली ग्रामस्थ कृती समितीचे अध्यक्ष लिगोरियो मोंतेरो आदी सहभागी झाले होते.एमपीटीच्या प्रशासकीय इमारतींच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर सुमारे दोन तास मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर एमपीटीचे उपमुख्य अभियंते टायटस मोराईस यांनी अभियानाशी बोलणी करण्याची तयारी दाखविली, मात्र अध्यक्ष प्रवीण अगरवाल यांच्याखेरीज अन्य कोणाशीही आम्ही बोलणी करणार नाही, अशी भूमिका अभियानने घेतली. त्यानंतर एमपीटीचे उपाध्यक्ष आश्विनकुमार वैष्णव, सचिन एन एस मडकईकर, मुख्य तांत्रिक अभियंता श्री. कुचेरिया, अभियंता श्री. लोखंडे बोलणी करण्यासाठी आले असता, मोर्चेकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अध्यक्ष अगरवाल बोलणी करण्यासाठी प्रवेशद्वारा समोर आले. यावेळी अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित करताना त्यांच्यावर आरोप केले. अगरवाल यांनी एमपीटीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तथापि, आम्हाला स्पष्टीकरण नको, आम्ही जे निवेदने दिले त्यासंदर्भात बोला असे सांगून त्यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्यात आला. यावेळी दक्षिण गोवाचे जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी संयमाने स्थिती हाताळली. अगरवाल यांनी आपली बाजू पत्रकारांमार्फत तुमच्यासमोर ठेवतो, असे अभियानच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी अगरवाल यांची प्रतिमा जाळली व सर्वजण तेथून पांगले. बंद आणि मोर्चाप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स, मामलेदार पुंडलीक खोर्जुवेकर, संयुक्त मामलेदार शेरू शिरोडकर, उपअधीक्षक देवू बाणावलीकर, अधीक्षक शेखर प्रभुदेसाई, निरीक्षक उत्तम राऊत देसाई, नोलास्को रापोस आदींनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.

1 comment:
कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याची प्रवृत्ती आता वाढत आहे. मुरगाव बंदराचा विकास रोखण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग मानायला हरकत नाही. कोणत्याही उद्योग, आस्थापनाचा विकास व वृद्धी होत असताना तेथे सुधारणा, नवीन, गोष्टी येणारच. मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये गोमंतकीय कामगारच नाहीत का? प्रकल्पाला विरोध करून ट्रकमालक स्वतःचे नुकसान करून घेत नाहीत का? नेते मंडळी, संघटना उभारून लोकांना भरीस घालतात. लोकांची गैरसोय तर होतेच. पण रोज कमावून जगणाऱ्यांचे हाल होतात. आंदोलनात सहभागी होणारे नेते प्रसंगी लाठीमार सहन करत नाहीत, तो लोकांना सोसावा लागतो. कोणताही प्रकल्प एका रात्रीत उभा राहत नसतो. त्याबाबतच्या अधिसूचना व आराखडे वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्यांचा अभ्यास हे नेते करीत नाहीत. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच विरोध करीत नाहीत. प्रादेशिक आराखडा जाहीर झाला त्यावेळी कुठे हरकती नोंदविल्या होत्या. नंतर आंदोलन उभारले. कोणत्याही प्रकल्पाचे फायदे काय, ते कोणाला होणार, तोटे काय, नागरिकांच्या समस्या किती वाढतील. याबाबत प्रकल्पाच्या निश्चितीपूर्वीच
आस्थापनाने व नेत्यांनीही जनजागृती करायला हवी. पण तसे होत नाही. लोकांनाही अखेरच्या क्षणी जाग येते. त्याला काय म्हणावे?
पश्चात बुद्धी पश्चात्ताप परंतु आधीच प्रतिबंधात्मक उपाय का केले जात नाहीत. मुरगाव बंदराच्या विकासामुळे कोळसा प्रदूषण होणार आहे, हे खरे परंतु खनिज धूळ प्रदूषणाकडेही लक्ष द्यायला हवे. कोळसा भिजवून त्याची पूड व धूळ उडणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे काम या नेत्यांनी करायला हवे. पण आंदोलन करायचे व नंतर शांत राहायचे हे काय कामाचे? बाबा आमटे यांनी जसे शेवटपर्यंत कार्यच केले तसे कोण करतो?
के.पी.
Post a Comment