Tuesday, February 12, 2008

गोव्यात मंत्रिमंडळ पुर्नरचनेची गरज आहे का? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

सल्ला सोनियांचा
सर्वांशी सल्लामसलत करा
मुख्यमंत्री - राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आज चर्चा


पणजी, ता. 12, प्रतिनिधी - मंत्रिमंडळातून कोणत्याही मंत्र्याला वगळण्याच्या निर्णयापूर्वी सर्व संबंधित नेत्यांशी विचारविनिमय करा, असा सबुरीचा सल्ला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना दिला. मुख्यमंत्री उद्या (बुधवारी) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करतील अशी दाट शक्‍यता आहे.
कामत यांच्यासह अर्थमंत्री दयानंद नार्वेकर, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, वाहतूक मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आज दिल्ली गाठली. तीन दिवसांची गोवा भेट आटोपून कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हरिप्रसाद हेही दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांसोबत हरिप्रसाद यांनी श्रीमती गांधी यांची भेट घेतली. मंत्रिमंडळातून कोणत्याही मंत्र्याला वगळण्याचा प्रयत्न सरकारच्या अंगलट येऊ शकतो, अशी कल्पना मुख्यमंत्र्यांनी श्रीमती गांधी यांना दिली. कोणताच मंत्री राजीनाम्यास तयार नाही. सक्तीने कोणत्याही मंत्र्याला वगळल्यास सरकारचे स्थैर्यच धोक्‍यात येऊ शकते, असे मत हरिप्रसाद यांनी श्रेष्ठींसमोर व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोव्यातील राजकीय वाद संपुष्टात आणण्यासाठी मार्गदर्शन करा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी श्रीमती गांधी यांना केली. सर्व ज्येष्ठ कॉंग्रेस व अन्य नेत्यांशी सल्लामसलत करा आणि नंतरच काय तो निर्णय घ्या, असा सल्ला श्रीमती गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
कोणत्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढायचे याचा निर्णय झालेला नाही. आपण आणखी सल्लामसलत करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून "गोमन्तक'ला सांगितले. म.गो.चे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात घेण्यात अडचणी येत असल्याने मुख्यमंत्री उद्या राष्ट्रवादीच्या दिल्लीतील अन्य ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतील, अशी शक्‍यता आहे. पवार यांना भेटूनच कामत गोव्याला परततील, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची आज नियोजन आयोगासोबतही बैठक झाली. येत्या 22 रोजी मुख्यमंत्र्यांची बैठक नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अहलुवालिया यांच्याबरोबर होणार आहे. कामत यांनी केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही आज भेट घेतली.

6 comments:

Ganesh said...

doesn't matter in any way for the common man! instead of shaking the governments every now and then, they should rather switch over to a `musical chair formula'to accomodate all the members in ruling combination in the cabinet for two and half year period for each member in an assembly's tenure. Atleast it will stop media entertainment! it may sound laughable, but that's the only available ultimate solution.

sakaal papers said...

मंत्रिमंडळ बदल करू नये
अलीकडच्या काळात गोव्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे? कोण मुख्यमंत्री, इतर खात्यांचे मंत्री कोण आहेत? आघाडी कोणाची आहे? या प्रश्‍नांचे उत्तरे देणे कठीण असते. कारण प्रत्येक दिवशी येथील सरकार पाडण्याचे, नवे घडवण्याचे नियोजन येथील आमदार करीत असतात. प्रत्येकाला अधिक फायदा, लाभाचे पद हवे असते. त्यामुळेच या प्रदेशात संधीसाधूंचे राज्य आले आहे. आता सरकार स्थिर झाले, विकास करावा. असा विचार येथील राजकारण्यांना सुचत नाही. पुन्हा अस्थिर होण्यासाठी एखाद्या मंत्र्याला बाजूला करून म. गो.च्या संधिसाधू ढवळीकरांना संधी देण्याचा घाट घातला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याची आवश्‍यकता नसतानाही, दिल्लीश्‍वर आणि स्थानिक नेते मंत्रिमंडळ बदलाचे आराखडे बांधत आहेत. याला विरोधही होतोय, पण आंधळ्या, पांगळ्याचे सोंग घेणाऱ्या राजकारण्यांना ते दिसत नाही, ते समजत नाही. राज्यात स्थिर सरकार ठेवून जोमाने राज्य कारभार करायचा असेल, तर मंत्रिमंडळात बदल न करणे हिताचे आहे.
- संजयसिंह पाटील

Unknown said...

सामान्य गोमंतकीयांच्या हिताकडे दुर्लक्ष करून केवळ सत्तेचे नाट्य खेळत राहणाऱ्या गोव्याच्या मंत्रिमंडळात वाढत असलेले रुसवे फुगवे पाहता लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना यापुढे निवडून द्यायचे, की नाही असा प्रश्‍न पडतो. दैनंदिन वाढत्या समस्यांनी हैराण झालेल्या जनतेला मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत काहीही स्वारस्य असणार नाही. कारण हा बाहेर गेला काय, नि तो आत आला काय त्यामुळे काहीही साध्य होणार नाही. सगळे एकाच माळेचे मणी असल्याने "हा खेळ राजकारण्यांचा' एवढेच लोक म्हणतील. रोज उठून मंत्रिमंडळासमोर असे पेचप्रसंग उभे राहणार असतील तर विधानसभाच बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीचा पर्याय आणणे हाच त्यावर जालीम उपाय ठरेल. एकवेळ ते चालू शकेल पण असले घाणेरडे राजकारण नको आणि अत्यंत गतिमान झालेल्या दैनंदिन जीवनात लोकांच्या डोक्‍याला तापही नको, असे प्रामाणिकपणे वाटते.
- अरुणोदय

Unknown said...

सरकार अस्थिर का करावे?
सरकार अस्थिर करीत राहण्यात जणू आनंद मिळत असल्यासारखे आमदारांचे प्रयत्न चालले आहेत. उगवला दिवस काय घेऊन येईल याची शाश्‍वती राहिलेली नाही. मुळात चांगले चाललेले सरकार पाडण्याचा प्रयत्न करून मगोने सरकारमधून बाहेर येण्याची गरज नव्हती. आता तो प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा सरकारमध्ये जाऊन मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न मगोने चालवला आहे. मगोचे हे राजकारण कोणालाही न पटणारे आहे. मगोने हे राजकारण करून काय मिळवले, याचा पक्षाने अवश्‍य विचार करावा. मगो आमदाराच्याच कृतीमुळे पडता पडता वाचलेले सरकार पुन्हा त्यांच्याच सहभागासाठी अस्थिर करायचे काहीच कारण दिसत नाही आणि कॉंग्रेसने तरी का करावे? याचाही विचार मगोने करावा.
मिथून

RUPESH PEDNEKAR said...

Congress Government says that the Government is of Aam Adami but in reality the Aam Adami the normal people supress by the hike in the rate of every commodity which they purchase. In true sense we said that the the leader we have appointed is for only making the money out of their position every politicion are trying to make more money they jump like anything.The Government is only of the rich people for them benefit and the common man have nothing to do unless pointing the govermnent

RUPESH PEDNEKAR said...

No need to change the formate of the Ministry if they went to touch one minister the hole ministry will colapse like cards for succesful functioning of goa there must be stable government