Thursday, February 14, 2008

"सेलेब्रिटी' कायद्यापेक्षा वरचढ आहेत का? प्रतिक्रिया नोंदवा.

संजय-मान्यता विवाह
बनावट कागदपत्रे प्रकरणी तलाठी निलंबित
"मेमो' स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कारवाई

मडगाव, ता। 14 प्रतिनिधी -अभिनेता संजय दत्त व मान्यताच्या विवाह नोंदणीसाठी चुकीच्या माहितीच्या आधारे रहिवासी दाखला दिलेला तलाठी प्रशांत कुंकळकर याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या दाखल्यासंबंधी मामलेदारांना अंधारात ठेवल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले आहे. सासष्टीचे मामलेदार परेश फळदेसाई यांनी यासंबंधी जारी केलेला "मेमो' स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी आज कुंकळकर याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला.संजय दत्त व मान्यता उर्फ दिलनशीन अमीर अहमद शेख यांच्या विवाहाची नोंदणी येथील उपनिबंधकांनी केली आहे. या नोंदणीसाठी संजय दत्त व मान्यता यांचे वास्तव्य मडगावात असल्याचा दाखला तलाठी कुंकळकर यांनी दिला होता. त्याबाबत मामलेदार फळदेसाई यांनी कुंकळकर याला "मेमो' देऊन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. कुंकळकर याने "मेमो' स्वीकारण्यास नकार दिल्याचा अहवाल आज सकाळी मामलेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुंकळकरच्या निलंबनाचा आदेश जारी केला.तलाठ्याने दाखला प्रकरणी मनमानी केली आणि मामलेदारांनाही अंधारात ठेवले, असे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणात दोषी ठरल्यास तलाठ्याला सेवेतून बडतर्फ केले जाईल आणि त्याने दिलेले दाखले रद्द करण्यात येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विवाह नोंदणी कार्यालयाचे उपनिबंधक चंद्रकांत पिसुर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी 2008 रोजी संजय दत्त व मान्यता विवाह नोंदणीसाठी कार्यालयात आले होते. शिवानंद राया कदम व भूषण शिवानंद कदम हे आके येथील व शिवानंद नाईक (रा. म्हापसा) त्यांच्यासोबत होता.

-----------------------------------------------------------------------------------------------
विवाह नोंदणीस आक्षेप
संजय दत्त व मान्यताच्या विवाह नोंदणीस पत्रकार ज्योकी ग्रासीयस यांनी आक्षेप घेतला असून यासंबंधी येथील उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. संजय दत्त व मान्यता गोव्याच्या रहिवासी नाहीत. गोव्यातील त्यांच्या वास्तव्यासंदर्भात दिलेले दाखले चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. त्यामुळे या विवाहाची नोंदणी गोव्यात होऊ शकत नाही. हे दाखले देताना तलाठ्याने अधिकारपदाचा गैरवापर केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे।

-------------------------------------------------------------------------------------------------

8 comments:

M. M. GAONKAR said...

उलट सेलिब्रिटींनी उदाहरण बनावे
देशात राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी सर्व कायदे पाळणे बंधनकारक आहे. त्यात भेदभाव असू नये किंवा केला जाऊ नये. ज्या सामान्य माणसांमुळे आपणास एवढी प्रसिद्धी मान मिळाला त्या सेलिब्रिटींनी कायद्यात सूट मागणे किंवा कायदे तोडणे अशी कामे करण्यापेक्षा ते योग्यपणे पाळून समस्त देशवासीयांपुढे आपले उदाहरण ठेवणे आवश्‍यक आहे.
- मिलिंद

Ganesh said...

The malpractices in the process of marriage registration has come to limelight only because it was a issue related to the marriage of a celebrittee. These illegal practices at the talathi level are a routine ones for a common man in the state adminiatration. The flaws in the registration system is attracting many couples accross the state borders to register their marriages in Goa. The same way as they cross Goa's borders to purchase cheaper liquor and the new vehicle registrarion !!

sakaal papers said...

"सेलिब्रिटी'चा दर्जा सामान्यच!
कायदा, नियमांपेक्षा "सेलिब्रिटी'चा दर्जा मोठा नाही. सर्व सामान्यांसाठी असलेले नियम, कायदे, सवलती "सेलिब्रिटी' साठी असतात, त्याचे पालन त्यांनी केले पाहिजे. सरकारी नोकरांनी नियमानुसारच वागले पाहिजे. तलाठ्याने संजय - मान्यता विवाहासाठी लागणारे दाखले बिनधास्तपणे दिले. यावेळी नियमांचे पालन केले नाही. कायद्याचे उल्लंघन केले. ही कृती गैर तर आहेच, त्यांची शिक्षाही संबंधितांना मिळायलाच हवी. "सेलिब्रिटी'ना वेगवेगळ्या ठिकाणी सवलती दिल्या जातात, त्यांचे चोचले पुरवले जातात. त्यामुळे सर्वसामान्यावर अन्याय होतो. तेव्हा सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे.

- जी संजय.

oconcept said...

दोघांना पोलिसांची बेडीही घालावी
प्रेक्षकांनी बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना केवळ मनोरंजन करणारा एक कलाकार याच नजरेतून स्थान दिले पाहिजे. सत्तर एमएम पडद्यावर ते जे इमेज पेश करतात ते केवळ आणि केवळ मनोरंजन असते हे आता सामान्यांनी उमजायला पाहिजे. यासाठी ते बक्कळ पैसे घेतात. ते प्रेक्षकांचे मनोरंजन करतात म्हणून त्यांना कायदा तोडण्याची मुभा देऊ नये, आणि प्रेक्षकांनीही त्यांना डोक्‍यावर चढवून ठेवू नये. लग्नवेदीवर चढणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा क्षण आहे. अशा वेळीही लांडीलबाडी करून सेलिब्रेटी सर्वसामान्यांपर्यंत काय विचार ठेवणार आहेत. आमीर खान, संजय दत्त, सलमान खान यांनी जे काही दिवे पेटवले आहेत ते त्यांच्या सेलिब्रेटी इमेजला शोभतच नाहीत.
दुसरा मुद्दा म्हणजे, संजय दत्त आणि मान्यता यांना लग्न गोव्याबाहेर करायचे होते तर कशाला उगीच हे गोव्यात खोटी कागदपत्रे सादर करून नोंदणी केली? दोघेही मुंबईत राहतात, तर तिथे यांनी का नोंदणी केली नाही? त्यामुळे आता त्यांना लग्नाच्या बेडीबरोबर पोलिसांचीही बेडी लागणे क्रमप्राप्त आहे
- इंद्रजित

Unknown said...

The malpractices like this must have happened in past also, but this this has come to limelite only because of this is the case related to celebrities. The mamlatdars and talathies must be following this illegal practice from long back and this will result in harassment for the AAm AAdmi to get the certificates. Celebrities cannot be treated separately, since they are also human beings and responsible citizens of India. Law should be same for all there should not be any descripency.

dayanand said...

"सेलिब्रिटी' व्यक्तींनी कायदा पाळावा
सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी, कोणावर अन्याय होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा, सर्वांचे हक्क अबाधित राहावे, यासाठी कायदा, नियम केलेले असतात. त्याचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. खास करून "सेलिब्रिटी'नी घेऊच नये. कारण त्यांनी चांगल्या वागणुकीचा आदर्श समाजासमोर ठेवायचा असतो. त्यांचे अनुकरण समाज करतो. संजय - मान्यता प्रकरणी नियमांचे उल्लंघन करून दाखले दिले गेले, हा गैर प्रकार आहे. तेव्हा संबंधितावर कारवाई होणे आवश्‍यक आहे. यापुढे सर्वांसाठी समान न्याय देण्यासाठी, नियमांचे पालन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपले वर्तन सुधारले पाहिजे.
- दयानंद

dayanand said...

"सेलिब्रिटी' व्यक्तींनी कायदा पाळावा
सर्व व्यवहार सुरळीत चालण्यासाठी, कोणावर अन्याय होऊ नये, सर्वांना समान न्याय मिळावा, सर्वांचे हक्क अबाधित राहावे, यासाठी कायदा, नियम केलेले असतात. त्याचा गैरफायदा कोणीच घेऊ नये. खास करून "सेलिब्रिटी'नी घेऊच नये. कारण त्यांनी चांगल्या वागणुकीचा आदर्श समाजासमोर ठेवायचा असतो. त्यांचे अनुकरण समाज करतो. संजय - मान्यता प्रकरणी नियमांचे उल्लंघन करून दाखले दिले गेले, हा गैर प्रकार आहे. तेव्हा संबंधितावर कारवाई होणे आवश्‍यक आहे. यापुढे सर्वांसाठी समान न्याय देण्यासाठी, नियमांचे पालन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपले वर्तन सुधारले पाहिजे.
- दयानंद

Sanjay Prabhu said...

Why blame selebrities, a stringent action should be taken against the officers involved. This might be only the tip of ice berge. I agree with Ganesh that corruption at talathi level is a routin.