आता परवाना लागणार
लंडन, ता. 16 पीटीआय -ब्रिटनमध्ये धूम्रपान करणार आहात? मग त्यासाठी यापुढे तुम्हाला ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाकडून परवाना काढावा लागण्याची शक्यता आहे. कारण सिगारेट विकत घेण्यासाठी परवाना असणे बंधनकारक करण्याचा कायदा करण्याची शिफारस ब्रिटन सरकारच्या आरोग्यविषयक सल्लागार समितीने केली आहे. मात्र, धूम्रपान करणाऱ्यांच्या संघटनांनी याला विरोध केला आहे.या परवान्याशिवाय कोणीही धूम्रपान करू शकणार नाही. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होईल, असे सल्लागार समितीचे अध्यक्ष ज्युलियन ले ग्रॅंड यांनी सांगितले. ते म्हणाले, ""धूम्रपान करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी सत्तर टक्के ही सवय सोडून देण्याच्या मनःस्थितीत असतात. हा परवाना मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणींमुळे आणि यानंतर वाढणाऱ्या खर्चामुळे अनेक जण धूम्रपान टाळणेच पसंत करतील.''या प्रत्येक परवान्यासाठी आवश्यक 10 डॉलर शुल्कातून जमा होणारा निधी राष्ट्रीय आरोग्य योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याचे ग्रॅंड यांनी सांगितले. तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करण्यासाठी भविष्यात अशा प्रकारची योजना असण्याच्या शक्यतेचा आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनीही इन्कार केला नाही.

2 comments:
धूम्रपान
भारतानेही कायदा करावाच
ब्रिटनमध्ये आता धूम्रपानासाठी परवाना लागणार, अशी बातमी वाचनात आली. आपण पाश्चात्त्यांचे अनुकरण करीत असतोच. भारत सरकारनेही आता तसा कायदा करावाच. केवळ कायदा करून भागणार नाही तर त्याची अंमलबजावणी कठोरपणे केली पाहिजे. खरे तर जास्त शिक्षित लोकांसाठीच अशा कायद्यांची गरज असते. काही ठिकाणी हॉटेलात आता स्मोकिंग व नो स्मोकिंग झोनही आहेत. वास्तविक हॉटेले, हॉस्पिटले, शाळा, मैदाने, चित्रपट व नाट्यगृहांत तर सिगारेट नेण्यासच मनाई केली पाहिजे. याबाबत शिक्षणाची व जागृतीची खरी गरज उच्च शिक्षित तसेच सेलिब्रिटीसाठी असते. नाही तर शाहरूख खानला राग आलाच नसता. मद्यप्राशनासाठी जसा काही ठिकाणी परवाना आहे तसाच धूम्रपानासाठी परवाना सर्वत्र आवश्यक करावा
जेप्रकाश
i m of d opinion that we have sufficiet laws,problem is of implementation.we need to increase the fine to 500rs for the first time n 2000rs for 2nd time. in western countries its difficult to frame new laws but once they r in place they implement it well.while in india its implementation is aproblem so trying to get new rules we should put efforts to enforce the laws in a better way
Post a Comment