Tuesday, January 22, 2008
विश्वजीत राणे यांचा राजीनामा फेटाळला
विश्वजीत राणे यांनी आरोग्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी फेटाळला आहे. यामुळे मंत्रीमंडळाची फेररचना करण्याची शक्यता मावळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आपली कोणतीही तक्रार नसून, कामत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आपले समर्थन कायम असल्याचे राणे यांनी आज येथे स्पष्ट केले. दिल्लीत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून गोव्यात परतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नवीन राजकीय समिकरणामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी युतीचे सरकार भक्कम झाल्याचा दावा राणे यांनी केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

6 comments:
छोटे खाशे जरा संभाल के
गोव्यात गेला आठवडा गाजला तो कामत सरकार जाणार की नाही. पण नव्या आठवड्याच्या सुरवातीला स्टॉक मार्केट घसरला तरी मात्र कामत सरकारचा वट वाढल्याचेच चित्र दिसून आले. एकूणच गोव्याच्या राजकारणात लंबी रेस का घोडा बनायचे असेल तर छोट्या खाशांनी थोडं सबुरीने आणि शांतपणाने पावले टाकायला हवीत.
- jai
आता बस्स झालं.. गोव्यात स्थिर सरकार कधी सत्तेवर येणार, याची आम्ही वाट पहात आहोत. गोव्यात गेल्या आठवड्याभरात ज्या राजकीय घडामोडी झाल्या, त्याला आता गोमंतकीय जनता कंटाळली आहे. एकीकडे जनता म्हणत आहे, कामत सरकार! आम आदमीच्या समस्या सोडवा तर दुसरीकडे मंत्री म्हणतात, आमच्या मागण्या मान्य करा. यामध्ये प्राधान्य कोणाला द्यावे, हे आता सरकारने ठरवायला हवे.
श्रीयुत दिगंबर कामत, मुख्यमंत्री गोवा राज्य
गोव्याच्या राजकारणात कोण, केव्हा, कधी, कोणाबरोबर असेल याचा नेम नाही. रात्री एकाबरोबर, पहाटे दुसऱ्या बरोबर, दिवस उजाडताच तिसऱ्याबरोबर संसार थाटण्याचा संकल्पच सध्याच्या विद्यमान आमदारांनी केलाय. याचे सचित्र दर्शन गोमंतकीयांना अवघ्या काही महिन्यात दोन वेळा झाले. कामत बदलणार, प्रतापसिंह येणार, विश्वजित की पर्रीकर अशा चर्चा झाल्या. परंतु अद्याप मुख्यमंत्रिपदावर दिगंबर कामत विराजमान आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवशी केलेली घोषणा लक्षात घेऊन "आम आदमी'साठी कार्य करावे, आम आदमीसाठी रस्ता, पाणी, वीज समस्या सोडवायला हव्यात. विरोधक कितीही एकमेकांशी हातमिळवणी करू द्या, आमदारकीचा राजीनामा देणारे देतील, पुन्हा निवडणूक येणारे तुम्हालाच पाठिंबा देतील, तुम्ही तुमचे प्रामाणिकपणे काम करा, हीच आम आदमीची इच्छा आहे!
- जी संजय
"विश्वजित'जी इकडे लक्ष द्या!
अलीकडे गोव्यात सगळीकडे बेवारस कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून "आम आदमी'ला जगणे मुश्कील झाले आहे. पंचायत, पालिका पातळीवर काहीच हालचाल केली जात नाही. आरोग्य केंद्रात वेळेवर रॅबिजविरोधी औषध उपलब्ध नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना कुत्रा चावल्यानंतर मोठे आर्थिक संकट उभे राहात आहे. महागडी इंजेक्शन खरेदी करणे शक्य होत नाही. आरोग्य मंत्र्यांनी मंत्रालयातील अस्थिरता संपलेली असल्यास, आपले आसन स्थिर झाले असेल तर या समस्येकडे लक्ष द्यायला हरकत नाही. आपण आरोग्य खात्यात सुधारणा करणार अशा घोषणा नेहमीच देता, त्या घोषणा कृतीत येऊ द्या. जनतेला दिलेली आश्वासने पाळा. जनतेच्या विश्वासाला पात्र व्हा! हीच एकच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे!
- जी संजय.
Enugh is enough, Mr. Vishwajeet Rane is acting too smart and this to is only because of his father.What he has done is the mockery of democracy. Day is not too far that Mr. Kamat will be begging on the streets of Goa to save his chair and support of Aam Aadmi
Sandew
ye to hona hi tha.
unless and until 2 party system is adopted these problems will not be solved.
Post a Comment