Monday, January 28, 2008

राजकीय घडामोडींच्यावेळी राज्यपालांची भूमिका कशी असते, कशी असावी?


राजकीय घडामोडींच्यावेळी राज्यपालांची भूमिका कशी असते, कशी असावी?
प्रतिक्रिया नोंदवा
------------------
राजकीय अस्थैर्यामुळे विकासावर परिणाम
राज्यपाल ः लोकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला
पणजी, ता. 27 प्रतिनिधी ः राज्यातील राजकीय अस्थिरतेचा विकासावर विपरीत परिणाम होत आहे. विकासासाठी पारदर्शक, प्रामाणिक व स्थिर राजकीय व्यवस्था असणे गरजेचे आहे. गोमंतकीय मतदार आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत आत्मपरीक्षण करावे, असा परखड सल्ला राज्यपाल एस. सी. जमीर यांनी काल दिला.
येथील कांपाल मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकावून मानवंदना स्वीकारल्यानंतर राज्यपाल बोलत होते. उत्कृष्ट सेवा व सुविधा पुरविण्यासाठी लोकांनी सरकारला मुक्‍त मनाने पाठिंबा व सहकार्य देण्याचे आवाहन राज्यपालांनी केले. राज्यातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सलोखा मजबूत करण्यासाठी लोकांनी स्वतःहून प्रयत्नशील राहावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, श्रीमती जमीर, श्रीमती आशा कामत, सभापती प्रतापसिंह राणे, खासदार फ्रान्सिस सार्दिन व अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. कठीण प्रयत्नांती स्वातंत्र्य मिळाले. ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची प्रतिज्ञा करा, असे आवाहन जमीर यांनी केले.
राज्यपाल म्हणाले, लोकशाहीच्या तत्त्वांनी रुजलेली भारतीय घटना म्हणजे सर्व नागरिकांना न्याय, समानता व बंधुभावाची खात्री देणारे साधन आहे. देशाच्या लोकशाही राजकीय पद्धतीमुळे मानवी प्रयत्नांच्या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाची संरक्षण दले सुसज्ज आहे.
गोव्याचा खास उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, एका दशकानंतर गोवा देशाच्या मुख्य विकास प्रवाहात सामील होऊनही गोव्याने बहुतेक क्षेत्रांत प्रगती केली. राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त केला आहे. विविध संस्थांनी
केलेल्या सर्वेक्षणात गोवा राज्य सामाजिक - आर्थिक विकासात प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचे आढळून आले आहे.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, उपअधीक्षक मोहन नाईक, हवालदार आनंद मोने, लाडू पाणकर, अशोक दत्ताराम मंगेशकर, सुरेश प्रियोळकर, अंगणवाडी सेविका श्रीमती ज्ञानस्पी फडते आणि मीना बोडके यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.

2 comments:

Ganesh said...

The Governor has all the powers vested in him as he is the representative of the president. has all the constitutional powers so as to keep the polity away from horse trading. however the office of the governor for last few years has been controversial, across the country. Its time for the governors to prove their seriousness and commitment to unbiased politics.

oconcept said...

राज्यपालांची भूमिका कशी असावी हा प्रश्‍न चघळत बसण्यापेक्षा राज्यपाल कोण असावा या मुद्‌द्‌यावर भर हवा. एखाद्या राजकीय पक्षाचा प्रतिनिधी राष्ट्रपती, राज्यपाल अशा महत्त्वाच्या पदांवर आला तर त्याच्याकडून अपेक्षा तरी काय ठेवणार? म्हणूनच राष्ट्रपती, राज्यपाल अशा पदांसाठी लायक म्हणून पक्षीय राजकारणातून निवृत्त झालेले उमेदवारच निवडावे. नव्हे, तशी या पदांच्या निकषांमध्ये बदल करणे आता काळाची गरज आहे. तसेच राज्यातील वा केंद्रातील सत्ता बदलली म्हणून राज्यपाल बदलणे हे गैर आहे. त्याची निवड ही पूर्ण कालावधीसाठीच हवी. असे जर झाले तरच राज्यपालपदाला आम आदमीच्या मनात मान राहील. नाहीतर गोव्याच्या विधानसभेत एक प्रकारे नेहमीच 40 नव्हे तर 40 अधिक 1 आमदार खेळखंडोबा करत राहतील.
- जयप्रकाश