Tuesday, January 29, 2008

मोपा विमानतळाला विरोध करणे, ही चर्चिल यांची चूक होती का? आपल्या प्रतिक्रिया नोंदवा




मोपा विमानतळ तत्वतः मान्यता
समितीचा निर्णय ः भू- संपादन सुरू होणार
पणजी, ता. 29, प्रतिनिधी- पेडणे तालुक्‍यातील मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यास तत्वतः मान्यता द्यावी, असा निर्णय आज येथे झालेल्या विमानतळ विषयक अभ्यास समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यसभा खासदार शांताराम नाईक, लोकसभा खासदार फ्रान्सिस सार्दिन, श्रीपाद नाईक, मुख्य सचिव जे. पी. सिंग आणि विमानतळ प्राधिकरणाचे एक वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
गोव्याला 2014 पर्यंत मोपा विमनतळाची गरजच आहे, असा अहवाल यापूर्वीच "आयकाव' या कॅनडास्थित संस्थेने दिला आहे. दाबोळी विमानतळावर विमानांच्या वाहतुकीची कोंडी होईल व त्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्याला गरजेचाच भासेल. दोन्ही विमानतळ गोव्यात चालतील, असे निरीक्षण आयकाव संस्थेने नोंदविले आहे. आजच्या बैठकीत आयकावचा अहवाल स्वीकारण्यात आला आणि मोपा विमानतळासाठी भू-संपादनाची प्रक्रिया नव्याने सुरू करावी, असे तत्वतः ठरले. समितीचे एक सदस्य शांताराम नाईक यांनी ही माहिती बैठकीनंतर "गोमन्तक'ला दिली.
राणे सरकारच्या काळात मोपा विमानतळाची प्रक्रिया रद्द होऊ देण्यात आली होती. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नेमलेल्या अभ्यास समितीचे काम पूर्ण होऊन निर्णय होईपर्यंत मोपा विमानतळाचे काम सुरू करायचे नाही, असे त्यावेळी ठरले होते. तथापि, आता कामत यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अभ्यास पूर्ण झाला आहे. आता ही समिती शिफारशींचा मसुदा तयार करणार असून हा मसुदा पुढील बैठकीवेळी निश्‍चित केला जाईल व त्यानंतर निष्कर्षांसह अहवाल सरकारला सादर केला जाईल, असे नाईक यांनी सांगितले.
मोपा विमानतळापासून धारगळच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा एक रस्ताही बांधला जावा, असे आजच्या बैठकीत ठरले. दाबोळी विमानतळ कायम सुरू रहावा म्हणून नौदलाच्या ताब्यातील काही जमीन सरकारने परत घ्यावी, अशी सूचना नाईक यांनी बैठकीत केली. नौदलाकडून जमिनीचा मालकी हक्क सांगितला जात असला तरी, त्याबाबतची कागदपत्रे तपासली जावीत आणि ज्या भूखंडांवर नौदलाचा हक्क नाही ते भूखंड सरकारने ताब्यात घेऊन दाबोळीच्या विस्तारासाठी द्यावेत, असे नाईक यांचे म्हणणे आहे.

7 comments:

sanjayghugretkar said...

मोपाला विरोध ः चर्चिलांचा निर्णय अयोग्यच!
"आयकाव' या कॅनडास्थित संस्थेने नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ गोव्याला गरजेचाच आहे, असा अहवाल दिला. आता आयकावचा अहवाल स्वीकारण्यात आला आणि मोपा विमानतळासाठी भू-संपादनाची प्रक्रिया नव्याने सुरू करावी, असे तत्त्वतः ठरले. त्यामुळे चर्चिलांचा त्यावेळचा निर्णय चुकीचा होता, हे सिद्ध झाले आहे. चुकीची भूमिका घेणाऱ्या चर्चिलनी आता शांतपणे या निर्णयाचे स्वागत करायला हवे, मोपामुळे गोव्याचे नुकसान होणार नाही, तर फायदाच होईल. विमान वाहतूक सुधारेल, गोव्यात पर्यटक येतील, इतर व्यवसायांनाही फायदा होईल.
गोव्यातील वाढता पर्यटन व्यवसाय, उद्योगाचे वाढते जाळे पाहता गोव्यातील वाहतूक सुविधा भविष्यात नक्कीच अपुऱ्या पडणार आहेत.
विमान वाहतूक वाढणार असल्याने नवा सुसज्ज विमान तळ हवाच. स्वार्थी राजकारणी नेहमीच गोव्यात राष्ट्रीय महत्त्व असलेल्या प्रकल्पांना विरोध करतात. त्याची ती वृतीच असावी. कोकण रेल्वेला विरोध केला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता रेल्वे गोव्यात आली आणि पुढे कर्नाटक, केरळपर्यत पोचलीसुद्धा! मोपाला विरोध केला नसता तर आता पर्यंत बरेच काम मोपा विमानतळाचे बरेच काम मार्गी लागले असते. उत्तर गोव्याच्या विकासाची गाडीलाही वेग आला असता. आता उशिरा का असेना, पण स्वार्थी राजकारण्यांनी गोव्याचा, देशाचा विचार करून मोपा विमान तळ लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करायलाच हवे!
- जी संजय

Unknown said...

may things and dids of churchill are funny... More funny is that, he dosen't know himslef what he is doing and what are outcoming of it... so forget about churchilll...!!

Ganesh said...

The anti-mopa agitation is proved to be purely political agitation now with the churchil as the member of the party in power. any way, mopa has brought him back in the assembly !! Now with the fresh nod for Mopa airport the due care be taken so that this project does not lend up in another land deal and real estate frau in north Goa.

Unknown said...

Mr. Churchill Alemao is a selfish politician. He wants to do his own development and doesnt thinks of society as a hole. Its better not to talk any thing about Mr. Churchil. Talking or writing about him is worthless. His name only specifies that he is a ill (sick) person.
Sandeep

sanjayghugretkar said...

At outset decision taken by Mr. churchill alemao was wrong.But it is good sign that he has accepted the facts.
Dayanand g.Prabhugaonkar

Unknown said...

केवळ आयकावचंच ऐकावं
भाषावाद असो, कोकण रेल्वे असो किंवा कोणताही विकास प्रकल्प असो चर्चिल यांनी केवळ विरोधच केला आहे. कोणत्या तरी श्रद्धा, अंधश्रद्धा, अज्ञान यांचा आधार घेत आपण अतिज्ञानी आहोत असा आव आणत आजवर त्यांनी अनेक आंदोलने सुरू केली. नंतर स्वार्थासाठी या आंदोलनातील हवा आपणच काढून घेतली. सेव्ह गोवा पक्ष वर्षपूर्तीही साजरी करू शकला नाही. तेच आता मोपाबाबतीत होणार आहे. सारे बांधव खाऊया (सांबाखा) हीच त्यांची आजवरची खरी (राज)नीती राहिली आहे. तेव्हा सरकारने आता केवळ आयकावचंच ऐकावं आणि उत्तर गोव्याच्या विकासाचे लॉंचिंग पॅड लवकर सुरू करावे.
सुभाष कुंभार

RUPESH PEDNEKAR said...

churchil what he said look to be wrong but in his all action their exist equal but opposite reaction
i dont say churchil is wrong but he is some sort of correct too because mopa does not generate any employement who have studied upto standard 10.