
महापालिका निष्काळजी ः वाहतुकीच्या गर्दीतून चालणे धोकादायक
पणजी शहराचा विकास वेगाने होत असला तरी फुटपाथांची समस्या कायम आहे. शहरात काही ठिकाणी फुटपाथची व्यवस्था नाही. त्यामुळे लोक वाहतुकीच्या गर्दीत, भर रस्त्यातूनच चालताना दिसतात. तर, काही ठिकाणी फुटपाथ ते असूनदेखील त्याच्यावर चालणे अशक्य अशी परिस्थिती आहे...
18 जून रस्त्यावरील फुटपाथ फिरते विक्रेते व पानवाले यांनी व्यापले आहे. नॅशनल थिएटर समोरील फुटपाथ गाडेवाल्यांनी अडवले आहे. इडीसी इमारतीसमोर जुन्ता हाऊसकडे जाण्यासाठी फुटपाथच नाही. त्यामुळे इमारतीला लागून वाहने पार्किंग करून ठेवली जातात. पोशाख शोरूम समोर फुटपाथ आहे, पण ते उंच-सखल आहे. त्यावरून चालताना कोणीही पाय घसरून पडण्याचा धोका अधिक आहे. प्रोग्रेस हायस्कूलकडे चला, तिथे रस्त्याच्या बाजूला उभा राहण्यासाठी जागा नाही. मुष्टिफंड शाळेसमोर अरुंद फुटपाथ असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर सर्व मुले रस्त्यात गर्दी करतात. डिचोली अर्बनसमोर फुटपाथ आहे, त्याचा उपयोग लघुशंकेसाठी केला जातो. पोलिस मुख्यालय, डॉन बॉस्को शाळा ते पेट्रोल पंप, मेफेअर हॉटेल, हॉटेल पार्क प्लाझा, सांतइनेज चर्च, धेंपे कॉलेज, सरकारी वसाहत सांतइनेज, ताळगावला जाणार रस्ता या परिसरात फुटपाथांचीही हीच समस्या आहे.

2 comments:
footpath is only for walkers, all illegal thigs on it should be removed... on the other hans peoples also shoud have habit of using it...
पदपथाचे मालक कोण?
पदपथ पणजी शहरातच काय पण कोणत्याच शहरात आहेत असे दिसत नाही. जे पणजीत तेच मडगावात, तेच म्हापशात. पदपथावरून चालणेही आताशा कठीण झाले आहे. रस्ते हे केवळ वाहनांसाठीच असतात, पदपथ हे दुकानांसाठी असतात तर पादचाऱ्यांनी कोठून चालावे, हे कोणीच सांगत नाही. पदपथावरून चालणे अशक्य होते. पणजीत पदपथ केवळ कांपाल परिसरातच आहेत. इतरत्र पदपथच नाहीत, मार्केटमध्ये, अठरा जून रस्त्यावर पदपथावर माणसांऐवजी दुकानांचे पेव दिसते. पदपथ असावेत हेच कोणाला मान्य नसावे. राज्यकर्ते, महानगरपालिका याबाबत उदासीन आहेच. वाहनचालक अनेकदा पदपथाला खेटूनच वाहने चालवितात, तेव्हा तेथून चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. त्यामुळे पदपथ कोणासाठी हा प्रश्न अनुत्तरित राहून त्यांचे मालक कोण अशी शंका येऊ लागते. महापालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याने पादचाऱ्यांसाठीच पदपथ उपलब्ध करून द्यायला हवेत.
के. रामप्रकाश
Post a Comment