कळंगुट-कांदोळीतील स्थिती चिंताजनक!कळंगुट, ता. ३ कळंगुट, कांदोळी म्हटले की डोळ्यासमोर येतो तो येथील निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळू... पण, जगप्रसिद्ध अशा या पर्यनटनस्थळाला सध्या मात्र मलेरियाने घेरले आहे. या परिसरात वेगाने सुरू असलेल्या बांधकाम व्यवसायामुळे येथे मलेरियाचे प्रवाढत चालले आहे. या समस्येकडे गंभीरपणे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, असे येथील चित्र आहे. येथील जमिनीखालील जलस्रोत दूषित झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास भविष्यात येथे अनेक रोगाची लागण होण्याची भीती लोकांकडून व्यक्त होत आहे.
सध्या येथे फाल्सिफेरम मलेरियाची समस्या उग्र होत चालली आहे. गोव्यात सापडणाऱ्या फाल्सिफेरम रुग्णांपैकी ३२ टक्के रुग्ण कांदोळी आरोग्य केंद्र क्षेत्रात आहेत. कांदोळी आरोग्य केंद्रात, कांदोळी, कळंगुट, हडफडे साळगाव सांगोल्डा, पिळर्ण, वेरे व नेरुल हा परिसर येतो. कांदोळी व कळंगुट परिसरात फाल्सिफेरमचे रुग्ण अधिक आहेत. येथे कामानिमित्त आलेल्या स्थलांतरित कामगारांमध्ये फाल्सिफेरम मलेरियाचे प्रअधिक आहे. येथे सुरू असलेल्या नवीन इमारत बांधकामासाठी या मजुरांची आवश्यकता आहेच. शिवाय सध्या पर्यटन हंगाम ओसरल्याने काही हॉटेल्सचे सुशोभीकरण, नूतनीकरण करण्यासाठी मजुरांची आवश्यकता असल्यामुळे त्यांना आता पावसाळ्यातही रोजगार मिळत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असला तरी स्थलांतरित कामगारांची संख्या कमी झालेली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment