Friday, July 4, 2008

गोव्यातील शेती खरोखरच संकटात आहे का, त्यामागची कारणे कोणती? याबाबतची आपली मते नोंदवा.

सासष्टीत शेती झालीय डोईजड!
सासष्टी तालुका हा गोव्याच्या राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात जसा अग्रभागी राहिलेला आहे तसाच तो शेतीमध्येही पुढे आहे. आजही सासष्टी तालुका भात उत्पादनात अग्रेसर आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये वाढते पर्यटन, शहरीकरण आणि एकूणच फ्लॅट संस्कृतीमुळे शेती व्यवसाय दुय्यम ठरू लागला आहे.सासष्टीतील अनेक लोकांनी आजही आपला पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीभाती सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एकूणच देशभर शेतीचे अर्थकारण बिघडलेले आहे त्याला सासष्टी तालुकाही अपवाद नाही. सासष्टी तालुक्‍यात सुमारे ६ हजार हेक्‍टर शेतजमीन भात लागवडीखाली आहे. गेल्या दशकभरात लोकांनी शेतीकडे पाठ फिरवली असली, तरी अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना सरकारतर्फे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा शेतीकडे वळू लागल्याचे दिसून येते. मात्र वाढती महागाई व शेतात काम करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव यामुळे सासष्टीतील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. सासष्टीचे कृषी विभागीय अधिकारी गिरीश केंकरे यांच्या मते, यंदा पन्नास टक्के शेतजमीन लागवडीखाली आली आहे. तरी पुढील महिन्याभरात आणखी पाच-दहा टक्के शेतजमीन लागवडीखाली येण्याची शक्‍यता आहे.

No comments: