Tuesday, July 1, 2008

तिळारी धरणग्रस्तांच्या प्रश्‍नाकडे सरकारचे दुर्लक्ष होतेय का?याबाबतची आपली मते नोंदवा."

तिळारी'च्या विस्थापितांना हवाय न्याय!
तिळारी धरणाचे ७५ टक्‍के पाणी गोव्याला मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्याग केलेल्या लोकांना गोवा शासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या धरणासाठी पाट्ये गावातील नागरिक शेकडो एकर वडिलोपार्जित जमीन, घरदार सोडून साळ गोवा येथे स्थलांतरित झाले. मात्र आज या लोकांना समस्यांच्या विळख्यात वावरावे लागत आहे. आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला न्याय द्या, असे गाऱ्हाणे घालून व त्यासाठी राज्य शासनाचे उंबरठे झिजवून ते आता थकून गेले आहेत.तिळारी धरणाच्या बुडीत क्षेत्राखाली येणाऱ्या पाट्ये येथील गावातील लोकांच्या स्थलांतराची प्रक्रया १९९७ साली सुरू झाली. गोव्यातील डिचोली तालुक्‍यातील साळ गावात त्यांच्या पुनर्वसनाची योजना तयार करण्यात आली. याठिकाणी प्रत्येक घरातील कुटुंबाप्रमाणे पाच ते दीड गुंठा जमिनीचे भूखंड विस्थापितांना वितरित करण्यात आले. आतापर्यंत या कॉलनीत सुमारे ७० घरे उभारण्यात आलेली आहेत. एकूण २०२ प्लॉट तयार करण्यात आले असून अजूनही पुनर्वसनाची प्रक्रया चालू आहे.

No comments: