Thursday, July 10, 2008

वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी काय करायला हवे? याबाबतची आपली मते नोंदवा.

वाढत्या वाहनांचा फोंड्यावर "ताण'!फोंडा, ता. १० : लोकसंख्या वाढली आहे, वाहनेही वाढत आहेत. पण, जागा मात्र आहे तेवढीच आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनांचा ताण वाहतुकीवर पडत असून वाहतूक कोंडीचे प्रकार उद्‌भवत आहेत. गोव्यातील सर्वच प्रमुख शहरांना ही समस्या सतावत आहे. फोंड्यात तर वाहनांची गर्दी एवढी वाढली आहे की, माणसे कमी पण वाहने जास्त आहेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
अंत्रुज महालातील फोंडा शहर म्हणजे तालुक्‍याचा केंद्रबिंदू. प्रियोळ, मडकई, शिरोडा आणि फोंडा या मतदारसंघासाठी फोंडा शहर म्हणजे मध्यवर्ती ठिकाण. दिवसाकाठी हजारो लोकांची येजा या शहरात होते. लाखो रुपयांचा व्यवहार येथील बाजारपेठेत होतो. भाजी, मासळी, कपडेलत्ते आणि ग्राहकोपयोगी वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी शहरात होते. या गर्दीबरोबर वाहनेही येतात, पण शहरात प्रवेश केल्यानंतर या वाहनांना ठेवायचे कुठे? असा प्रश्‍न वाहनचालकांना पडतो. मग जागा मिळेल तेथे ही वाहने ठेवली जातात. वाहतूक कोंडीच्या परिणामांची फिकीर न करता...!

No comments: