Wednesday, July 16, 2008

"खासगी बस वाहतुकीतील समस्या कशा सोडवता येतील?

धंदा तोट्यात, समस्यांच्या विळख्यात...पण!
ता. १६: व्यवसायातील वाढती स्पर्धा आणि वाढत्या महागाईतून इंधन, टायर आणि इतर गोष्टींचे वाढलेले दर यामुळे खासगी प्रवासी बसचा व्यवसाय तोट्यात चालला आहे. याशिवाय इतर समस्यांनीही त्यांना घेरले आहे. वाहक-चालक यांची मनमानी व बेशिस्त वर्तणूक यामुळे प्रवाशांची मने कलुषित होत आहेत, हा भाग वेगळाच. अशास्थितीत हा व्यवसायच नकोसा झाला आहे, असे मत अनेक बसमालकांनी "गोमन्तक'कडे व्यक्‍त केले.
गोव्यात पोर्तुगिजांच्या राजवटीत लोक बहुतेकदा पायी चालत प्रवास करीत. नंतरच्या काळात बैलगाड्या हेच प्रवासाचे एकमेव साधन बरीच वर्षे टिकून राहिले. पोर्तुगिजांनी तळागाळातील लोकांचे प्रवासासाठी होत असलेले हाल पाहून "कार्रेथ' हे वाहन आणून लोकांची सोय केली. गोव्याच्या मुक्तीनंतरही रस्त्यावर "कार्रेथ' हे प्रवासाचे साधन असले, तरी लोक बैलगाड्यांचाही प्रवासासाठी उपयोग करीत. "कार्रेथ'नंतर मोठ्या बसेस रस्त्यावर आल्या. आता सर्वत्र बसगाड्याच जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन बनले आहे.

No comments: