Monday, June 9, 2008

"कोबो कार्बन' प्रकल्पामुळे खरोखरच प्रदूषण होईल का ? याबाबतची आपली मते नोंदवा.

प्रदूषणाची धास्ती - "कोबो कार्बन'विषयी कालेत संभ्रम

सांगे, ता. ७ - चौगुले खाण कंपनीने काले ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वतःच्या मालकीच्या जमिनीत "पुनाफार्म' येथे "कोबो प्रकल्प' सुरू करावा यासंदर्भात केवळ चाचपणी केली अन्‌ प्रदूषण होईल या भीतीने पर्यावरणप्रेमी प्रकल्पाविरुद्ध सक्रिय झाले. अद्याप कंपनीने प्रकल्प सुरू करण्यासाठी काले ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला मागितलेला नाही किंवा तशा प्रकारची चर्चाही पंच मंडळाच्या बैठकीत झालेली नाही. मात्र, लोकांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने या प्रकल्पाचा प्रस्तावच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकंदरीत "कोबो कार्बन प्रकल्पा'ची कालेवासीयांनी धास्ती घेतली आहे.हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यातील उत्पादन कशा स्वरूपाचे असेल हेही उघड झालेले नाही. गेली सत्तर वर्षे चौगुले खाण कंपनी कष्टी गावात आपला व्यवसाय चालवत आहे. मात्र, हल्लीच कष्टी खाण व्यवस्थापनाने प्रत्येक गोष्टीत कष्टीवासीयांना "बायपास' केले आहे, असा सरळ आरोप ग्रामस्थ करू लागले आहेत. स्थानिकांचा विचार केला जात नाही, या विचाराने स्थानिक लोक कंपनीविरुद्ध बोलू लागले आहेत. ट्रक व्यवसायाला साथ दिली जात नाही, नोकरदारांना जवळ केले जात नाही यातूनच गेल्या वर्षभरात चौगुले खाण कंपनी आणि कष्टीवासीयांचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे प्रस्तावित कोबो प्रकल्पाला विरोध होण्याची शक्‍यता अधिक आहे.सावर्डे पंचायत क्षेत्रात असलेल्या काही वेगळ्या कंपन्यांच्या प्रकल्पांचे दुष्परिणाम कालेवासीयांना भोगावे लागत आहेत. गोवा स्पॉंज, श्रद्धा इस्पात व जैन उद्योग या तीनही प्रकल्प व्यवस्थापनाने स्थानिकांना कशा प्रकारे वाकुल्या दाखविल्या आहेत हे कष्टीवासीयांना पूर्णपणे ठाऊक आहे. यामुळे ताकही फुंकून प्यावे अशी सावध भूमिका कष्टीवासीयांनी घेतली असून याच भावनेतून ते कोबो कार्बनच्या प्रस्तावाला विरोध करू लागले आहेत.

No comments: