Friday, June 13, 2008

पायलटांच्या समस्या आणि त्यांना आवश्‍यक सुविधा पुरवण्याबाबतची आपली मते नोंदवा

टॅक्‍सी पायलटांचे' भवितव्य अधांतरी!
टॅक्‍सी मोटरसायकल पायलट' सेवा उपलब्ध असलेले गोवा हे एकमेव राज्य आहे. देशभरात एखादा अपवाद वगळल्यास कुठल्याही ठिकाणी ही सेवा आढळणार नाही. पोर्तुगीज काळापासून ही सेवा येथे सुरू आहे. टॅक्‍सी पायलटांनी या व्यवसायाचे पारंपरिक स्वरूप राखून अद्याप आपले उपजीविकेचे साधन अजूनपर्यंत टिकवून ठेवले आहे, पण पायलटांना कोणी वाली नाही. त्यांचे भवितव्य अधांतरी असल्याची चिन्हे दिसून येतात. एकेकाळी टॅक्‍सी मोटरसायकल पायलटांना उत्तम प्रतसाद व मागणी होती, पण गेल्या एक-दीड दशकापासून पायलटांच्या संख्येत अमर्याद वाढ व गिऱ्हाईकांच्या संख्येत घट यामुळे पायलट धंद्याला उतरती कळा लागली आहे.शहरात पोर्तुगीज काळात सुमारे पाचशेहून अधिक टॅक्‍सी मोटरसायकल पायलटांची संख्या होती. आता शहरात अडीचशे ते तीनशे टॅक्‍सी मोटरसायकल पायलट दिसून येतात व दिवसभर उन्हात तापून पायलटांना रात्री दोनशे रुपये घरी घेऊन जाणे कठीण होते. टॅक्‍सी पायलटांचा हा पारंपरिक धंदा आधीपासून सुरू असला, तरी नोंदणी पुस्तिकेत त्यांची नोंद नव्हती. १९८१ साली "मडगाव टॅक्‍सी मोटरसायकल पायलट संघटना' स्थापन करून निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली. गेली २५ वर्षे संघटनेचा कारभार सुरळीत चालू आहे. पूर्वी पायलटांना अधिकृत स्टॅंड नव्हते. सरकारने अलीकडे पायलटांना शहराच्या जवळपास अधिकृत १७ स्टॅंड दिले आहेत. प्रत्येक स्टॅंडवर पंधरा ते वीस पायलटांची सोय करण्यात आली आहे. पालिका इमारत, स्टेट बॅंक, कदंब स्थानक, रेल्वे स्थानक या ठिकाणी थोडे जास्त म्हणजे पंचवीस-तीस पायलटांची सोय करण्यात आली आहे.

No comments: