Tuesday, June 10, 2008

बाणस्तारच्या बाजारातील गैरसोय व कसा हवा नवा बाजार प्रकल्प...याबाबतची आपली मते नोंदवा.

बाणस्तारीचा बाजार अद्याप उपेक्षितच...
माशेल, ता. १० प्रतिनिधी - बाणस्तारचा बाजार हा गोव्यात सर्वपरिचित आहे. मात्र गोव्यातल्या ऐतिहासिक बाजाराची सध्या दुर्दशा झाली असून, अनेक अडचणी व गैरसोयींनी त्याला घेरले आहे. कारण गोवा मुक्‍तीनंतर त्याच्या विकासाकडे कोणी गंभीरपणे पाहिलेच नाही. आता आमदार दीपक ढवळीकरांनी बाजार प्रकल्प उभारण्याचा संकल्प केल्यामुळे बाजारकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत...बाणस्तारी येथील हा बाजार आज-कालचा बाजार नसून, जाणकारांच्या मते त्याला दोनशे पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. हा बाजार गोव्यातील पोर्तुगीज राजवटीचा साक्षीदार असून, ज्या काळात रहदारीची विशेष साधने नव्हती. पै-पैशाने व्यवहार केला जायचा किंवा माला बदली माल दिला जायचा अशा काळात सुरू झालेला अंत्रूज महालातील आणि गोमंतकातील पहिला आठवडी बाजार.

No comments: