Wednesday, June 11, 2008

हाऊसिंग प्रकल्प गोव्यासाठी फायदेशीर आहेत का...?याबाबतची आपली मते नोंदवा.

चोडणवासीयांचा "विरोध' यशस्वी होणार?
चोडण, ता. ११ - चोडण बेटावर "मेगा हाउसिंग प्रकल्पा'ला मान्यता दिल्याने येथील लोकांना एका गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. अशाप्रकारचे आणखी प्रकल्प शेतजमिनीत उभारण्यास सरकारने मान्यता दिल्यास भविष्यात पर्यावरण, पाणी, कचरा, सामाजिक प्रदूषण व पायाभूत सुविधांवर ताण पडण्याचा धोका आहे. यामुळे उद्‌भवणाऱ्या इतरही अनेक समस्यांना चोडणवासीयांना सामोरे जावे लागणार असून या प्रकल्पाविरुद्ध चोडणवासीयांनी एकत्र येऊन सरकार व पंचायतीविरुद्ध लढा देणे गरजेचे असल्याचे, मत येथील जागरूक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

1 comment:

Guttu said...

मेगा हा‌उसिंग प्रकल्प फ़ायदेशीर आहे पण ते अशा जागी बनवावे जिथे शेतजमीन वा झाडे नसतील. शोधलं तर अशा जागा जरूर मिळतील. असे प्रकल्प जेव्हा बनतात तेव्हा पावसाचे पाणी साठवण्याचे ऊपाय लागू केले पाहिजे. त्यामुळे पाण्याची समस्या थोडी कमी होईल. सगळी घरे एकीकडे असण्याने कचरा विल्हेवाट चांगल्या पद्धतीने करता येईल. पण सध्यातरी हे प्रकल्प नको त्या जागी बांधुन पर्यावरणाचे नुकसानच होईल. एक मात्र नक्की. वाढत्या लोकसंख्येमुळे मेगा हाऊसिंग प्रकल्प आपले भविष्य बनले आहेत.